कोल्हापूर/प्रतिनिधी : वनसंवर्धन दिनाचे औचित्य साधून रोटरी क्लब ऑफ करवीर आणि प्रिन्सेस पदमाराजे गर्ल्स हायस्कुल कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने इ वेस्ट विषयी जनजागृती आणि संकलन हा उपक्रम राम गणेश गडकरी हाॅल येथे उत्साहात पार पडला. प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण महामडंळचे उपमुख्य अधीकारी प्रमोद माने हे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रोटरी क्लब ऑफ करवीर चे प्रेसिडेंट प्रशांत उर्फ उदय पाटील हे होते. रो. प्रमोद चौगले यानी व्हीडीओ फिल्मच्या माध्यमातून इ वेस्ट संदर्भात सवीस्तर माहीती दिली. या कार्यक्रमाचे नियोजन ई वेस्ट चेअरमन रो. एस.एन.पाटील यानी केले होते
तसेच २०२२-२०२३ चे इंटरॅक्ट कल्बचा पदग्रहण समारंभ माजी अध्यक्ष रो.निशीकांत नलवडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पाडला.या वेळी शाळेचे मुख्याध्यापीका संध्या चौगुले , महेश सुर्यवंशी, प्रेमलता सावंत, सचिन हरबद, रोटरी सेक्रेटरी स्वप्निल कामत, रो. दिलीप प्रधाने, रो. अंकुश कारंडे, रो.निलेश भादुले, रो.प्रकाश माने, रो. चदांराणी पाटील ऊपस्थीत होत्या.