भविष्यात डिजिटल मीडिया हा माध्यमांमध्ये सक्षम पर्याय म्हणून उदयास येईल : जिल्हाधिकारी राहुल रेखावार..!

कोल्हापूर/प्रतिनिधी: डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या नूतन पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांची सदिच्छा भेट घेतली. संघटनेचे राज्य कार्यकारिणी सदस्य : प्रमोद मोरे, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष: सुहास पाटील,जिल्हासचिव: मदन अहिरे, महान्यूजचे रितेश पाटील, जिल्हा प्रसिद्धीप्रमुख: वैभव प्रधान,नाज अत्तार यांनी पुष्पगुच्छ देऊन जिल्हाधिकाऱ्यांचे स्वागत केले.

यावेळी जिल्हाधिकारी व संघटनेचे पदाधिकारी यांच्यात कोल्हापूर जिल्ह्यातील विविध विषयांवर चर्चा झाली. कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासात्मक दृष्टिकोनातून डिजिटल मीडियाचे प्रशासनाला भविष्यकाळात चांगल्या पद्धतीचे सहकार्य मिळावे अशी अपेक्षा जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांनी पदाधिकाऱ्यांच्याकडे व्यक्त केली. तर प्रशासनाच्या मार्गदर्शनाने व सहकार्याने जिल्ह्यातील अनेक विषय सर्व जनमानसापर्यंत डिजिटल मीडियाच्या माध्यमातून पोहचवू अशी ग्वाही नूतन पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिली. या भेटीप्रसंगी डिजिटल मीडियाचे जिल्हाधिकाऱ्यांनी कौतुक केले. तसेच भविष्यात डिजिटल मीडिया हा माध्यमांमध्ये सक्षम पर्याय म्हणून उदयास येत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

Advertisements

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *