वडिल-मुलाच्या नात्यावर प्रकाश टाकणारा “”एकदा काय झालं”” चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज…!

कोल्हापूर/प्रतिनिधी : गोष्ट कोणाला नाही आवडतं. प्रत्येकाला गोष्ट ऐकायला किंवा सांगायला आवडते. आपली, आपल्या आसपासच्या प्रत्येक व्यक्तीची काही ना काही गोष्ट असते. अशाची एक गोष्ट घेऊन अभिनेता सुमित राघवन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. वडिल आणि मुलाच्या नात्यावर प्रकाश टाकणाऱ्या, डॉ. सलील कुलकर्णी दिग्दर्शित चित्रपट ‘एकदा काय झाले’ याचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झालेला आहे

 काही दिवसांपूर्वीच चित्रपटांचा एक मोशन पोस्टर रिलीज करत या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. टीझर प्रसिद्ध झाल्यापासून प्रेक्षक चित्रपटाच्या ट्रेलरची अतुरतेने वाट पाहत होते. सुमित राघवन आणि सलील कुलकर्णी यांनी आपल्या इंस्टाग्राम हॅन्डलवर या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित केला आहे. हा ट्रेलर शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, प्रत्येक आईबापाने आपल्या मुलांबरोबर बघावा… आणि मुलांनी आजी आजोबांचा हात धरून त्यांना घेऊन जावं असा चित्रपट… एकदा काय झालं!! ‘

Advertisements

एकदा काय झाल’ हा चित्रपट गोष्टींच्या दुनियेत रमणाऱ्या बाप-लेकाची गोष्ट आहे. हा चित्रपट म्हणजे गोष्ट सांगणाऱ्या एका माणसाची आणि ‘मला सेम बाबा व्हायचंय…’ असं म्हणणाऱ्या त्याच्या मुलाची कथा आहे. नात्यांचे बंध, भावनांचे अर्थ, एकमेकांबद्दल वाटणारं प्रेम, जिव्हाळा दर्शविणाऱ्या गोष्टी सांगणारा हा चित्रपट ५ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे.  

अभिनेता सुमीत राघवन, उर्मिला कोठारे, बालकलाकार अर्जुन पुर्णपात्रे यांच्या मुख्य भूमिका आहेत. यांसोबतच मोहन आगाशे, सुहास जोशी, मुक्ता बर्वे, पुष्कर श्रोत्री, राजेश भोसले या कलाकारांनी आपल्या अभिनयाने चित्रपट एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवला आहे. चित्रपटाच्या ट्रेलरसोबतच त्यातील गाण्यांचीही जोरदार चर्चा होत आहे. या चित्रपटातील विशेष बाब म्हणजे यातील एक अंगाई प्रसिद्ध गायिका सुनिधी चौहान यांनी गायली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *