Share Now
Read Time:1 Minute, 11 Second
MEDIA CONTROL ONLINE
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आपल्या वादग्रस्त विधानांमुळे नेहमीच चर्चेत असतात. यावेळी त्यांनी मुंबईच्या निमित्तानं मराठी माणसावर निशाणा साधला आहे. मुंबईला देशाची आर्थिक राजधानी बनवण्यात राजस्थानी – गुजराती समाजांचे योगदान उल्लेखनीय आहे. जर गुजराती माणूस मुंबई सोडून गेला तर मुंबईला आर्थिक राजधानी कोणीही म्हणणार नाही, वादग्रस्त विधान त्यांनी केलं. या भाषणाची व्हिडीओ क्लिप सध्या सर्वत्र व्हायरल होत आहे. अन् हा व्हिडीओ पाहून मराठी माणूस खवळला आहे. सोशल मीडियाद्वारे राज्यपालांवर जोरदार टीका केली जात आहे. तुमच्याकडे ऐवढे पैसे आहेत तर स्वत:च्या राज्याचा विकास का केला नाही? अशा प्रतिक्रिया देत त्यांना ट्रोल केलं जात आहे.
Share Now