आतापर्यंत गुलाब पाहिले,आता त्यांनी काटे बघायला तयार राहा”, उद्धव ठाकरे यांचा बंडखोर आमदार आणि भाजपला इशारा…!

MEDIACONTROL ONLINE 

मुंबई: आपली प्राणप्रिय संघटना शिवसेना फोडण्याचे गेल्या अनेक वर्षात अनेक वेळा प्रयत्न झाले. पण यावेळी मात्र शिवसेनेला संपविण्याचा यांचा डाव आहे. पण त्यांना माहिती नाही, अशी कित्येक आव्हाने पायदळी तुडवत त्याच्यावर आम्ही भगवा झेंडा रोवला आहे. आतापर्यंत गुलाब पाहिले. आता त्यांनी काटे बघायला तयार राहावं”, असा इशाराच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदार आणि भाजपला दिला.

Advertisements

उद्धव ठाकरे यांनी मातोश्री निवासस्थानाबाहेर शिवसेना कार्यकर्ते-पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी गेल्या महिनाभराच्या राजकारणाचं त्यांनी सिंहावलोकन करताना बंडखोरांवर तोफ डागली. तर शिवसेना संपत चालेलला पक्ष म्हणणाऱ्या भाजपाध्यक्ष जे पी नड्डांना जशास तसं उत्तर दिलं. “आजपर्यंत शिवसेनेच्या वाट्याला आव्हानं काय कमी आलेली नाहीत. संघर्ष हा शिवसेनेच्या पाचवीला पुजलेला आहे. त्यामुळे सध्या आलेलं आव्हान शिवसेनेसाठी नवीन नाही. मी सांगू इच्छितो, गुलाब गेले असतील तरी गुलाबाचे झाड माझ्याकडे आहे. पुन्हा नवीन गुलाब फुलविन”, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी कार्यकर्त्यांमध्ये जान भरली.

“आपली लढाई दोन-तीन पातळीवर सुरू आहे. रस्त्यावरच्या लढाईत आपण मागे पडणार नाहीत. न्यायालयीन लढाईतही आपण मागे नाही आहोत. दिग्गज वकील आपल्यासाठी लढतायेत. कायद्याची लढाई सुरू आहे, न्याय देवतेवर माझा विश्वास आहे. पण दुसऱ्या बाजूला पक्षीय पातळीवर आपल्याला संघटना बांधणीचं मोठं काम हाती घ्यायचंय. त्याची सुरुवात १५ दिवसांपूर्वी झालेली आहे. शिवसेना पक्ष सदस्य नोंदणीचं काम मोठ्या प्रमाणात करायचं आहे. आता तुम्ही शपथपत्रांचे गठ्ठे आणले आहेत, तसेच गठ्ठेच्या गठ्ठे मला हवे आहेत”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *