रस्ते पॅचवर्कची कामे २५ ऑगस्ट पर्यंत पूर्ण करा – प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे…!

0 0
Getting your Trinity Audio player ready...

Share Now

Read Time:3 Minute, 4 Second

कोल्हापूर/प्रतिनिधी : गणेश उत्सव २०२२ च्या अनुषंगाने शहरातील रस्त्यांचे पॅचवर्क २५ ऑगस्ट पर्यंत पुर्ण करण्याच्या सूचना प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांनी शहर अभियंता यांना दिल्या. आयुक्त कार्यालयात गणेश उत्सवाच्या पुर्व तयारीची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये शहर अभियंता यांनी चारही विभागीय कार्यालयाअंतर्गत पॅचवर्कचे एस्टिमेट तयार करण्यात आले असून लवकरच कामाला सुरवात करणार असलेचे शहर अभियंता यांनी सांगितले. घरगुती व सार्वजनिक गणपती ठिकठिकाणी ठेवलेल्या कुंडापासून इराणी खणीपर्यंत नेण्यासाठी ९० टॅम्पो व २० ट्रॅक्टरची प्रत्येकी २ प्रमाणे १८० हमालासह व्यवस्था करण्यात आली असलेचे सहा.अभियंता यांत्रिकी यांनी सांगितले.

प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांनी गणेश उत्सवाच्या अनुषंगाने ज्या काही निविदा प्रक्रिया अंतिम टप्यात आहेत त्या तातडीने पुर्ण करण्याच्या सुचना सर्व संबंधीत अधिकाऱ्यांना दिल्या. श्री गणेश आगमन, मिरवणूक मार्ग व विर्सजन ठिकाणी लाईट बंद असलेस ती तातडीने सुरु करण्याच्या सूचना दिल्या. ज्या ज्या ठिकाणी मंडप व बॅराकेटींगची आवश्यकता आहे त्या ठिकाणी वार्षिक ठेकेदारामार्फत काम करुन घेण्याच्या सूचना दिल्या. विभागीय कार्यालय व आरोग्य स्वच्छता विभाग यांनी विशेष स्वच्छता मोहिम राबवून खरमाती व कचरा उठाव करावा. यासाठी गणेश उत्सवापुर्वी येणारे शनिवारी व रविवारी हि विशेष मोहिम राबवावी. मागिल वर्षीप्रमाणे याही वर्षी विर्सजनाचे नेटके नियोजन करण्याच्या सूचना सर्व अधिकाऱ्यांना दिल्या. 

यावेळी अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, उप-आयुक्त रविकांत आडसूळ, शिल्पा दरेकर, सहा.आयुक्त संदीप घार्गे, शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत, उपशहर अभियंता हर्षजीत घाटगे, नारायण भोसले, एन.एस.पाटील, बाबूराव दबडे, मुख्य आरोग्य निरिक्षक डॉ.विजय पाटील, पर्यावरण अधिकारी समीर व्याघ्रांबरे, मुख्य अग्निशमन अधिकारी तानाजी कवाळे उपस्थित होते.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *