स्वतःचाच राष्ट्रीय विक्रम मोडून रौप्यपदक केले नावावर… अविनाश साबळेने रचला इतिहास….!

MEDIA CONTROL ONLINE

महाराष्ट्राच्या अविनाश साबळेने आज इतिहास रचला. कारण राष्ट्रकुल स्पर्धेत भारताला स्टीपलचेसमध्ये पदक जिंकवून देणारा अविनाश हा पहिला खेळाडू ठरला आहे. त्याचबरोबर अविनाशने राष्ट्रीय विक्रम मोडीत काढला असून रौप्यपदकाला गवसणी घातली आहे.

Advertisements

अविनाशची ३००० मीटर स्टीपलचेस ही शर्यत चांगलीच रंगतदार झाली. शर्यतीच्या अंतिम फेरीत केनियन खेळाडूंना कडवी टक्कर दिली. अविनाशने ८:११.२० सेकंदाच्या राष्ट्रीय विक्रमी वेळेसह रौप्यपदक जिंकले. भारत आणि केनिया यांच्यामध्ये यावेळी कडवी झुंज पाहायला मिळाली, चौथ्या क्रमांकावर असलेल्या अविनाशने अखेरच्या राऊंडपर्यंत हे स्थान कायम राखले होते. त्यावेळी अविनाश रौप्यपदक पटकावेल, असे कोणालाही वाटले नव्हते. अखेरच्या लॅपमध्ये अविनाशने मुसंडी मारली आणि थेट रौप्यपदकाला गवसणी घातली. आतापर्यंत एकाही भारतीयाला राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत स्टीपलचेसमध्ये पदक जिंकता आले नव्हते. पण अविनाशने यावेळी कमालच केली. ही शर्यत पाहताना अविनाश पदक जिंकेल, असे कोणला वाटले नव्हते. पण अविनाशने यावेळी विचारपूर्वक कामगिरी केली. कोणत्या क्षणी काय करायचे हे त्याने ठरवले होते. त्यामुळेच त्याला रौप्यपदक पटकावता आले आहे. भारताचे हे स्टीपलचेसमधील पहिलेच पदक आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *