वृत्तपत्रांच्या निकोप वाढीसाठी निस्वार्थी झटणारे जेष्ठ संपादक नेते : आप्पासाहेब पाटील

विशेष वृत्त कौतुक नागवेकर

सांगली – सांगलीचे ज्येष्ठ संपादक आप्पासाहेब पाटील यांचा आज वाढदिवस. आप्पासाहेब पाटील यांनी आपल्या जीवनामध्ये अनेकांना मदतीचा हात दिला आहे. त्याचबरोबर ज्या कामात ते हात घालतात अथवा जे काम हाती घेतात ते तडीस नेण्यासाठी तन,मन,धनासह अपार कष्ट व अभ्यास करीत असतात. यामुळे आप्पासाहेब पाटील यांचे व्यक्तिमत्व सर्वांना हवेहवेसे वाटते. ज्या क्षेत्रांमध्ये काम करण्याची संधी मिळेल, त्या क्षेत्रातील बारकांव्याचा अभ्यास करून अनेकांना मदत करायची हा आप्पासाहेबांचा स्थायीभाव असल्यामुळे आप्पासाहेब पाटील यांचा महाराष्ट्रभर मित्रपरिवार फार मोठा आहे. सांगली जिल्हा युवक अध्यक्ष, सांगली जिल्हा काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष ते ज्येष्ठ संपादक असा आप्पासाहेब पाटील यांचा प्रवास अत्यंत महत्त्वाचा व अभ्यासपूर्ण आहे. या प्रवासामध्ये आप्पासाहेबांना जो मित्रांचा गोतावळा लाभला तो क्वचितच एखाद्याच्या नशिबी असतो, असे म्हणावे लागेल.

Advertisements

शांत, संयमी, अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून आप्पासाहेब पाटील यांच्याकडे पाहिले जाते. कोणताही प्रश्न शासन स्तरावर मांडताना वरकरणी व वरवर मांडायचा नाही. तर त्या प्रश्नांचा सर्वांगीण व चौफेर अभ्यास करून शासन स्तरावर मांडल्यामुळे नेहमीच आप्पासाहेब पाटील यांनी मांडलेले प्रश्न, समस्या निकाली निघालेल्या आहेत. महाराष्ट्र राज्यातील वृत्तपत्राच्या अनुषंगाने अनेक संघटना कार्यरत आहेत. मात्र कोणत्याही संघटनेबद्दल ब्रशब्द न काढता, आपण जे काम हाती घेतले आहे. ते इमाने इतबारे प्रामाणिकपणे करायचे. हा आप्पासाहेबांचा स्वभाव असल्यामुळे इतरांच्या कामात कधीच ते हस्तक्षेप करीत नाहीत. आपल्या प्रमाणेच किंबहुना कोणत्याही संघटनेच्या पदाधिकाऱ्यानी कोणताही प्रश्न सोडविला तर आप्पासाहेब पाटील यांना नेहमीच समाधान होत असते. कारण या ना त्या कारणाने प्रश्न कोणी सोडवला, याच्यापेक्षा प्रश्न मार्गी लागला, यामध्ये समाधान मानणारे आप्पासाहेब पाटील आहेत. आजही वयाच्या ७८ व्या वर्षी युवकाला लाजवतील असे काम आप्पासाहेब पाटील करीत आहेत. वास्तविक पाहता एक गोष्ट येथे अधोरेखित करावी लागेल. आप्पासाहेब पाटील यांनी सांगली जिल्हा युवक समाचार हे वृत्तपत्र सुरू केले. त्याचप्रमाणे युवकाला लाजवेल अशी आप्पासाहेब पाटील यांचे काम करण्याचा जोश व उत्साह सातत्याने सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *