Share Now
कोल्हापूर – भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पुर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुंसार दि.९ ते १७ ऑगस्ट २०२२ या कालावधीत महापालिकेच्यावतीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. या उपक्रमाअंतर्गत महापालिकेच्यावतीने शहरामध्ये ११ ठिकाणी प्रबोधनात्मक होर्डींग्ज लावण्यात आली आहेत. यामध्ये १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान शहरातील सर्व नागरीकांनी घरोघरी तिरंगा या उपक्रमात सहभागी व्हावे आणि आपल्या घरावर तिरंगा फडकवावा असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे. हे होर्डिंग्ज् शहरातील मुख्य चौक, एस.टी.स्टॅन्ड व महापालिकेच्या कार्यालयाबाहेर लावण्यात आलेली आहेत. यामध्ये प्रामुख्याने रंकाळा चौपाटी, रंकाळा एस.टी.स्टॅन्ड, संभाजी नगर एस.टी.स्टॅन्ड, मध्यवर्ती बर स्थानक, कावळा नाका, महालक्ष्मी मंदिर, केशवराव भोसले नाटयगृह, महापालका मुख्य इमारत बाहेर, विभागीय कार्यालय परिसर व छत्रपती शिवाजी चौक या ठिकाणी लावण्यात आलेली आहेत.
Share Now