शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या पूर्वतयारीसाठी पक्ष पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न

मुंबई: 19 जून रोजी पार पडणाऱ्या शिवसेनेच्या 58 व्या वर्धापनदिनाच्या तयारीच्या अनुषंगाने आज पक्षाचे सर्व नेते, मंत्री, आमदार आणि पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक आज मुंबईत पार पडली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्ष पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना […]

यंदाचा शाहू पुरस्कार ज्येष्ठ समाजसेवक, पत्रकार पन्नालाल सुराणा यांना जाहीर….

कोल्हापूर : राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टतर्फे दिला जाणारा मानाचा ३८ वा राजर्षी शाहू पुरस्कार ज्येष्ठ समाजसेवक, पत्रकार पन्नालाल सुराणा यांना जाहीर झाला आहे. शाहू जयंतीचे औचित्य साधून २६ जून २०२४ रोजी सायंकाळी 6 वाजता […]

शाळांना आवश्यक शैक्षणिक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यास प्राधान्य
- पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे

सांगली : खाजगी शाळामध्ये ज्या प्रमाणे शैक्षणिक सुविधा देण्यात येतात त्याच पध्दतीने महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद शाळांमध्ये आवश्यक शैक्षणिक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यास शासनाने प्राधान्य दिले आहे. मुलांना शिक्षणाबरोबरच चांगले संस्कार मिळून आदर्शवत भावी […]

थायोमेथोक्झामच्या बिज प्रक्रियेद्वारे करा सोयाबीनवरील खोडमाशीचे व्यवस्थापन…

सांगली : किटकशास्त्र विभागाने बिज प्रक्रिया करूनच सोयाबीन पीक पेरावे या संदर्भात संदेश प्रसारीत केला होता. ज्या शेतकऱ्यांनी बिज प्रक्रिया केली तेथे खोडमाशीवा प्रादुर्भाव अल्प प्रमाणात दिसून आला. त्यामुळे हंगामाच्या सुरुवातीपासूनच या किडीच्या व्यवस्थापणासाठी बिज […]

शंभर कोटी रस्त्यांचा दर्जा तपासणीसाठी पंचनामा करणार  : आप

कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य सुवर्ण जयंती महाभियान अंतर्गत कोल्हापूर शहरातील सोळा रस्त्यांसाठी तब्बल शंभर कोटींचा निधी उपलब्ध झाला. गेल्या डिसेंबरमध्ये याची वर्क ऑर्डर एवरेस्ट कंपनीला देण्यात आली. योजनेचा गाजावाजा करत पालकमंत्र्यांच्या हस्ते रस्ते कामाचा आरंभ […]

खासदार छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते ‘अष्टपदी’ चित्रपटाचा मुहूर्त संपन्न..

‘अष्टपदी’ या आगामी मराठी चित्रपटाच्या चित्रीकरणाला नुकतीच सुरुवात करण्यात आली आहे. अक्षय्य तृतीयेच्या शुभ दिवशी ‘अष्टपदी’ चित्रपटाचा मुहूर्त करण्यात आला होता. तेव्हापासून अनोख्या शीर्षकामुळे या चित्रपटाबाबत कुतूहल वाढलं आहे. चित्रपटात नेमकं काय पाहायला मिळणार आणि […]

कुवैतच्या आगीत मृत्युमुखी पडलेल्या 45 भारतीयांचे मृतदेह देशात पोहोचले
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून मदतीची घोषणा

नवी दिल्ली  : कुवैतच्या दक्षिण मंगफ परिसरातील इमारतीला लागलेल्या भीषण आगीत  काही दिवसांपूर्वी 45 भारतीयांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, या दुर्घटनेत महाराष्ट्रातील मुंबई, मालाड (पश्चिम) येथील डेनी बेबी करुणाकरण यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. भारतीय […]

तृतीयपंथीयांसाठी 21 जून रोजी विशेष कार्यशाळा..

सांगली :  तृतीयपंथीयांना ओळखपत्रे व प्रमाणपत्रे वितरीत करणे, त्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी त्यांची प्राथमिक माहिती संकलित करणे, तृतीय पंथीयांच्या हक्कांचे संरक्षण व कल्याणबाबत काही अडचणी, समस्या असल्यास त्या जाणून घेणे, या व्यक्तींच्या शासनाप्रती […]

प. महाराष्ट्रातील शेतीला दिवसा वीजपुरवठ्यासाठी ‘सौर’ ऊर्जा प्रकल्पांचे काम सुरु..

पुणे : शेतीला दिवसा वीजपुरवठा करण्यासाठी राज्य शासनाच्या मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० ची युद्धपातळीवर अंमलबजावणी सुरु आहे. आवश्यक शासकीय जमिनींच्या अधिग्रहणाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पहिल्या टप्प्यात पश्चिम महाराष्ट्रात ९०० मेगावॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा […]

कोल्हापुरात कोयना एक्स्प्रेसखाली चिरडून दोन महिलांसह चिमुकलीचा मृत्यू….!

कोल्हापूर : मुंबईतून कोल्हापूरच्या दिशेनं येणाऱ्या कोयना एक्स्प्रेसखाली सापडून दोन महिलांसह लहान मुलीचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना कोल्हापुरात घडली आहे. ही घटना शुक्रवारी रात्री 8 च्या सुमारास घडली. या भीषण अपघातात दोन महिलांसह लहान […]