आदमापूरच्या बाळूमामा देवालयासह जिल्हयातील पर्यटन स्थळांच्या विकासासाठी रु . ८ कोटी ६१ लाखांचा निधी मंजूर : खासदार संजय मंडलिक

कोल्हापूर/प्रतिनिधी,दि १ : शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक विभागाकडील प्रादेशिक पर्यटन विकास योजने अंतर्गत पर्यटन स्थळांच्या ठिकाणी पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी सन २०२१-२२ या वर्षाकरीता आदमापूर येथील बाळूमामा देवस्थान सह कागल तालुक्यातील निढोरी , कुरणी , सुरुपली […]

किरीट सोमय्या यांनी मी मंत्रिपदाच्या माध्यमातून मिळविलेला भ्रष्टाचाराचा एक पैसा जरी सिद्ध केला तर त्यांची हत्तीवरून मिरवणूक काढू : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ

‍करनूर/प्रतिनिधि दि. १:कि‎रीट सोमय्या यांनी मी मंत्रिपदाच्या माध्यमातून मिळविलेला भ्रष्टाचाराचा एक पैसा जरी सिद्ध केला तर त्यांची हत्तीवरून मिरवणूक काढू, असे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले आहे. कागल तालुक्यातील करनूर येथे विकासकामांच्या लोकार्पण […]

रासायनिक खतांचा पुरवठा सुरळीत करा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा: नेताजी बुवा ,जिल्हा उपाध्यक्ष संभाजी ब्रिगेड

हमिदवाडा प्रतिनिधी, दि १ : कागल तालुक्यासह कोल्हापूर जिल्ह्यात रासायनिक खतांचा कृत्रिम तुटवडा जाणवत आहे याबाबत ठोस उपाय योजना करून हा रासायनिक खतांचा तुटवडा पूर्ववत करावा या मागणीचे निवेदन तालुका कृषी अधिकारी कार्यालय कागल या […]

निवडणूक आयोगाने मतदानासाठी ठरवून दिलेल्या  १२ पैकी १ पुरावा ग्राह्य धरणार : निवडणूक निर्णय अधिकारी श्रावण क्षीरसागर….!

कोल्हापूर/प्रतिनिधी  दि. १ : जिल्हयातील २७६ कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघाच्या पोट निवडणुकीचे मतदान दिनांक १२ एप्रिल २०२२ रोजी सकाळी ७.०० ते सायं. ६.०० वाजेपर्यंत मतदान होणार आहे. या निवडणुकीत निवडणूक आयोगाने मतदानासाठी ठरवून दिलेल्या  […]

गृहमंत्र्यांवर मुख्यमंत्री नाराज अशा बातम्या काही माध्यमांवर येत आहेत. या बातम्यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खंडन केले आहे

मुंबई प्रतिनिधी : अशा बातम्या चुकीच्या आणि विपर्यास्त करणाऱ्या असून माझा माझ्या सहकाऱ्यांवर पूर्ण विश्वास आहे, आणि ते उत्तम काम करीत आहेत असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.

शिंगणापूर पाणी उपसा यंत्रामध्ये बिघाड झाल्याने १ एप्रिलपासून एक दिवस आड पाणी पुरवठा..!

कोल्हापूर /प्रतिनिधी : शिंगणापूर योजनेवरील पाणी उपसा यंत्रामध्ये बिघाड झाल्याने या योजनेवरील चार पंपांचा पाणी उपसा कमी प्रमाणात होत आहे. त्यामुळे ए/बी व ई वॉर्ड त्यास सलग्नीत उपनगरे ग्रामिण भागातील दैनंदिन पाणी पुरवठा पूर्ण क्षमतेने […]

महापालिकेच्या महसूली उत्पन्नामध्ये ३८०.६३ कोटी महसूल जमा…!

कोल्हापूर/प्रतिनिधी : महानगरपालिकेच्या सन २०२१-२२ या आर्थिक वर्षामध्ये सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत विविध विभागाकडून महसूली उत्पन्नामधून ३८०.६३ कोटी महसूल जमा झाला आहे. यामध्ये नगररचना विभागाने ६६.६० कोटी महसूल जमा केला आहे. नगररचना विभागाला यावर्षी ४४.६८ कोटीची […]

उघड्यावर कचरा जाळल्या प्रकरणी महावितरणच्या कर्मचाऱ्यांना दंड…

कोल्हापूर/प्रतिनिधी : शेंडापार्क येथील महाराष्ट्र विद्युत मंडळ कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी उघडयावर कचरा जाळल्याबदल महापालिकेच्यावतीने दंड करण्यात आला. महानगरपालिकेमार्फत मान्सून पूर्व नियोजनासाठी नाले सफाईचे काम सुरु आहे. प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी या कामाची पाहणी करत असताना […]

डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय औषधांच्या विक्रीविरोधात,कडक कारवाई करण्याचे आदेश : राजेंद्र पाटील यड्रावकर…!

मुंबई/प्रतिनिधी,दि. ३० : औरंगाबाद शहरातील औषध विक्री दुकानात डॉक्टरांच्या चिकित्सा चिठ्ठीशिवाय गोळ्यांची विक्री होत असल्याबाबत प्रसार माध्यमांमध्ये प्रसारित होत असलेल्या बातम्यांची गंभीर दखल घेतली असून, त्याविरुध्द कडक कारवाई करण्याचे आदेश प्रशासनास दिले आहेत, असे अन्न […]

जिल्हास्तरीय लोकशाही दिन रद्द….!

कोल्हापूर/प्रतिनिधी, दि. २९ : २७६- कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघाची पोट निवडणूक जाहीर झाली आहे. त्याची आचारसंहिता लागू झाली असल्याने दि. ४ एप्रिल रोजी होणारा जिल्हास्तरीय लोकशाही दिन घेण्यात येणार नाही, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी […]