अन् सतेज पाटील यांच्या साठी एक तरुण पोहचला दिल्ली मध्ये….!

कोल्हापूर/प्रतिनिधी :  मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रासह देशात अनेक राजकीय घडामोडींचा वेग वाढला आहे. यातच काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष बदलणार असल्याची जोरदार चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे. याच संबंधित आता एक वेळी बातमी समोर आली आहे. […]

….आणि अनुभवता आला राधानगरी धरणाचा रोमांचकारी क्षण!

कोल्हापूर….  राजर्षी शाहू महाराजांच्या कृपादृष्टीनं कोल्हापूरकरांशी नाळ जोडलेलं ऐतिहासिक धरण म्हणजे राधानगरी धरण..! याच धरणाच्या स्वयंचलित सात दरवाज्यांमधून बाहेर पडणाऱ्या पाण्याचा महाकाय विसर्ग पाहून अनेकांना धास्ती भरते.. पण याच सात स्वयंचलित दरवाज्यांतून वाहणारा जोराचा वारा […]

Weather Updates: राधानगरी धरण पूर्णपणे भरण्यासाठी ८ ते १० दिवस लागतील: रोहीत बांदिवडेकर कार्यकारी अभियंता.

कोल्हापूर/प्रतिनिधी, दि.१३ :  कोल्हापूर जिल्ह्यात सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. गगनबावडा, राधानगरी येथे अतिवृष्टी मुळे जिल्ह्यात पुन्हा एकदा पुराची स्थिती निर्माण झाली आहे. धरणक्षेत्रात होणाऱ्या पावसामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. सद्य […]

पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर आमदार ऋतुराज पाटील यांची रामानंदनगरला भेट…!

कोल्हापूर/प्रतिनिधी : संभाव्य पूर परिस्थितीचा धोक्याच्या पार्श्वभूमीवर आमदार ऋतुराज पाटील यांनी रामानंदनगर परिसराला भेट देऊन पाहणी केली. यानंतर त्यांनी रामानंदनगर तालीम मंडळाच्या कार्यालयात बैठक घेऊन स्थानिकांच्या समस्या जाणून घेतल्या. गतवर्षीच्या अतिवृष्टीमुळे रामानंद नगर परिसरात पुराचे पाणी […]

प्रकल्पग्रस्त वसाहतींचा विकासही ताकतीने केला : आमदार हसन मुश्रीफ

कोल्हापूर/प्रतिनिधी,दि.१२ :  कागल विधानसभा मतदारसंघातील गावे, वाड्यावस्त्यांसह प्रकल्पग्रस्त वसाहतींचा विकासही मोठ्या ताकतीने केला, असे प्रतिपादन आमदार हसन मुश्रीफ यांनी केले. धरणांच्या बांधकामासाठी घरेदारे, शेतीवाडी त्याग केलेले प्रकल्पग्रस्तच समृद्धीचे खरे शिल्पकार आहेत, असेही ते म्हणाले.कसबा सांगाव […]

जीजेसीच्या लाभम चर्चासत्राला व्यावसायिकांचा प्रतिसाद

कोल्हापूर/प्रतिनिधी : सराफ व्यावसायिकांनी त्यांचा गल्ला सोडला तरच व्यवसायात वाढ होईल, असे मत जीजेसीचे अध्यक्ष आशीष पेठे यांनी व्यक्त केले. ऑल इंडिया जेम अँड ज्वेलरी डोमेस्टिक कौन्सिल व कोल्हापूर जिल्हा सराफ संघाच्या वतीने येथील हॉटेल […]

Weather Updates : सद्यस्थितीत वर्षा सहलीला, ट्रेकिंगला जाणे टाळा : जिल्हाधिकारी राहुल रेखावार

कोल्हापूर/प्रतिनिधी दि.१२ :  गेले दोन आठवडे जिल्ह्यात सुरु असलेल्या संततधार पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्याचबरोबर धरण क्षेत्रातील पाणी पातळीत वाढ झालेली दिसून येत आहे. सद्यस्थितीत सुरक्षिततेच्या दृष्टीने नागरिकांनी वर्षा सहलीला, […]

श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे ह्या वर्षातील पहिला दक्षिणद्वार सोहळा पहाटे संपन्न झाला …

कोल्हापूर/प्रतिनिधी : श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे या वर्षातील पहिला दक्षिणद्वार सोहळा आज संपन्न झाला.गेल्या एका आठवड्यापासून कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे.तसेच राधानगरी धरणातून सुद्धा मोठ्या प्रमाणत विसर्ग सुरू असल्याने पंचगंगा नदी व कृष्णा नदीच्या […]

कोल्हापूर : शालेय विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या बसचा अपघात…!

कोल्हापूर/प्रतिनिधी : विदयार्थ्यांना शाळेला घेऊन जाणाऱ्या बसचा अपघात झाला. स्कुलबस रस्त्यावरून घसरून बाजूच्या शेतात पलटी झाली. या अपघातात दहा-ते बारा विद्यार्थी जखमी झाले आहेत. त्यांना खासगी व प्राथमिक रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. सर्व […]

Weather Updates:राधानगरी धरणातून १३५० क्युसेक विसर्ग सुरू…!

 कोल्हापूर/प्रतिनिधी दि.११ : जिल्ह्यातील राधानगरी धरणात १२४.१७२ दलघमी पाणीसाठा आहे. आज सकाळी ७ वाजल्याच्या अहवालानुसार राधानगरी धरणातून १३५० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पंचगंगा नदीवरील- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ, भोगावती नदीवरील- हळदी, सरकारी […]