श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे ह्या वर्षातील पहिला दक्षिणद्वार सोहळा पहाटे संपन्न झाला …

कोल्हापूर/प्रतिनिधी : श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे या वर्षातील पहिला दक्षिणद्वार सोहळा आज संपन्न झाला.गेल्या एका आठवड्यापासून कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे.तसेच राधानगरी धरणातून सुद्धा मोठ्या प्रमाणत विसर्ग सुरू असल्याने पंचगंगा नदी व कृष्णा नदीच्या पाणी पातळीत चांगलीच वाढ झाली आहे. 

कृष्णा नदीच्या पाण्याने शिरोळ तालुक्यातील श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथील मंदिरातील दत्त पादुकांना स्पर्श केले. येथील दत्त मंदिरात पहाटे नदीचे पाणी उत्तर बाजूने येऊन श्रींच्या पादुकांना स्पर्श करून ते दक्षिणेकडे बाहेर पडले. यामुळे या वर्षातील हा पहिला ‘दक्षिणद्वार सोहळा’ संपन्न झाला.  दक्षिणद्वार सोहळा पाहण्यासाठी भाविकांनी नृसिंहवाडी दत्त मंदिरात गर्दी केली होती. 

Advertisements

पंचगंगा आणि कृष्णा नदीच्या पाणीपातळीत वाढ होत असल्याने येथे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मंदिरामध्ये पोलिस बंदोबस्त आणि लाईफगार्ड तैनात करण्यात आले आहेत. दरवर्षी शिरोळ तालुक्याला सर्वात जास्त पुराचा फटका बसतो पुरात शिरोळ तालुक्यातील जवळजवळ ३६ गावे पुराच्या पाण्याखाली जातात. यामुळे शिरोळ तालुक्यामध्ये NDRF ची एक टीम तैनात करण्यात आली आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *