येत्या 2 ते 3 महिन्यात श्री बलभीम तालमीच्या इमारतीचे काम पूर्ण करू …

रहीम पिंजारी /कोल्हापूर : कसबा बावडा येथील 100 वर्षांपासून नामांकित मल्ल घडविणारी श्री बलभीम तालमीच्या इमारतीच्या नुतणीकरणाबाबत आज मा. आमदार सतेज(बंटी)पाटील व आमदार ऋतुराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कसबा बावड्यातील माजी नगरसेवक, श्री राम सेवा संस्थेचे […]

जिल्ह्यात शाळाबाह्य, अनियमित व स्थलांतरीत बालकांची ५ ते २० जुलै कालावधीत शोधमोहीम

कोल्हापूर : जिल्ह्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षक तसेच अंगणवाडी सेविका/ मदतनीस यांच्या मदतीने दि.५ ते २० जुलै २०२४ या कालावधीत शाळाबाह्य बालकांच्या घरोघरी सर्वेक्षण करुन त्यानुसार आढळणा-या बालकांना शिक्षणाच्या प्रवाहात दाखल […]

राधानगरी धरणातून 1100 क्युसेक विसर्ग सुरु – जिल्ह्यातील 7 बंधारे पाण्याखाली

कोल्हापूर : जिल्ह्यातील राधानगरी धरणात 2.54 टीएमसी पाणीसाठा आहे. आज सकाळी 7 च्या अहवालानुसार राधानगरी धरणातून 1100 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे.पंचगंगा नदीवरील- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी व तेरवाड, कासारी नदीवरील यवलूज असे 7 […]

रोटरीचा करवीर भूषण पुरस्कार प्रा. पी एस पाटील यांना प्रदान!

कोल्हापूर: रोटरी क्लब ऑफ करवीर च्या 34 व्या वर्धापन दिनानिमित्त, दरवर्षी देण्यात येणारा मानाचा, ‘करवीर भूषण पुरस्कार’ शिवाजी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू प्रा. पी.एस.पाटील यांना नुकताच प्रदान करण्यात आला. रोटरी डिस्ट्रिक्ट 3170 चे डीजी रिप्रेझेंटेटिव्ह व डिस्ट्रिक्ट […]

छत्रपती शाहू महाराजांच्या जयंती निम्मित ऐतिहासिक वास्तू दर्शन केएमटी बस सेवेचे उद्घाटन…

कोल्हापूर प्रतिनिधी/रहीम पिंजारी : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंती निमित्त आज दिनांक 30 जून रोजी केएमटी उपक्रमाची ऐतिहासिक वास्तु दर्शन बस सेवेचा उद्घाटन शुभारंभ अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांच्या शुभहस्ते दसरा […]

आरोग्य यंत्रणा सक्षम असणे काळाची गरज; वैद्यकीय क्षेत्राच्या समस्या सोडविण्यास प्रयत्नशील :  राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर
Competence of health system is the need of the hour in Kolhapur; Trying to solve the problems of the medical field

कोल्हापूर : कोव्हीड सारख्या महामारीने संपूर्ण जगात वैद्यकीय क्षेत्राच्या मर्यादा दाखवून दिल्या आहेत. त्यामुळे आरोग्य यंत्रणा सक्षम असणे काळाची गरज आहे. सद्याच्या आधुनिक जगतामध्ये वैद्यकीय क्षेत्रातही आधुनिक सुधारणा झाल्या आहेत. पण वैद्यकीय क्षेत्राशी निगडीत समस्यांमध्येही […]

जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय सल्लागार व आढावा समितीची बैठक संपन्न

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्याला 26 हजार 700 कोटींच्या वार्षिक पतपुरवठा आराखड्याचे उद्दिष्ट देण्यात आल्याची माहिती देवून जिल्हाधिकारी अमोल येडगे म्हणाले, खरीप हंगामासाठी पीक कर्जाची जुलै अखेर 100 टक्के उद्दिष्टपूर्ती करा. दुग्ध व्यवसाय अंतर्गत किसान क्रेडिट […]

कदम बजाज मध्ये “ई पॅसेंजर” व “ई कार्गो” या रिक्षांचे अनावरण…

कोल्हापूर/प्रतिनिधी : सध्या वाढते प्रदुषण आणि वाढती वाहन संख्या पाहता पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीकोणाने हरित उपक्रमाचा भाग म्हणून बाजारपेठेत दाखल झालेल्या बजाज आर ई पॅसेंजर व ई कार्गो  या रिक्षांचे अनावरण आणि पश्चिम महाराष्टातील कदम बजाज […]

कोल्हापूर शहरातील राजाराम तलावाकाठी अत्याधुनिक आंतरराष्ट्रीय कन्व्हेंशन सेंटर उभारण्यात येणार

मुंबई : कोल्हापूर जिल्ह्याचा झपाट्याने विस्तार होत असून, औद्योगिक, व्यापार, बांधकाम, कृषी या क्षेत्रातील सुरु असणारी घोडदौड त्यानुषंगाने सामाजिक, वैचारिक, राजकीय, सांस्कृतिक अभिसरण या सर्वांचा विचार करता विविध संघटनांच्या सामुहिक बैठका, विचारांचे अदान-प्रदान, सांस्कृतिक देवाण-घेवाण […]

सोमवारी ‘जनता दरबार’ : तक्रारींच्या निराकरणासाठी नागरिकांनी उपस्थित रहावे

कोल्हापूर:  वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली सोमवार दिनांक 1 जुलै 2024 रोजी सकाळी 10 वाजता ताराराणी सभागृह, जिल्हा नियोजन समिती, जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर येथे ‘जनता दरबार’ आयोजित करण्यात आला आहे. जिल्ह्यातील […]