मोदी है तो मुमकिन है… भाजपचे खासदार धनंजय महाडिक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा भाजपने देशातील तीन राज्यात निर्विवाद यश मिळवले आहे. 

त्यामुळे देशात मोदी यांचाच करिष्मा कायम असल्याचे दिसून आले आहे. नरेंद्र मोदी यांची गॅरंटी देशातील जनतेने मान्य केली- स्वीकारली. आणि त्यामुळेच तीनही राज्यात भाजपने घवघवीत यश मिळवले आहे. उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी भाजपच्या प्रचार मोहिमेत सहभाग घेऊन मोठे योगदान दिले होते. भाजप हाच पक्ष देशाचा सर्वांगीण विकास करू शकतो, याची जनतेला खात्री पटली आहे. आणि त्यामुळेच भाजपचा विजयी रथ अखंडपणे घोडदौड करत आहे. आगामी लोकसभा निवडणुकीतही जनता जनार्दन पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांनाच पंतप्रधान बनवणार, हे आता निश्चित झाले आहे. या निवडणुकीत भाजपला कौल देणाऱ्या तमाम जनतेचे मी अभिनंदन करतो आणि त्यांचे आभार मानतो.

Advertisements

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *