गारपीट आणि अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना तातडीने भरपाई मिळावी, खासदार धनंजय महाडिक यांची राज्यसभेत मागणी

Mediacontrolnews network

नवी दिल्लीत आजपासून सुरू झालेल्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्यातील एका महत्त्वाच्या समस्येकडे खासदार धनंजय महाडिक यांनी लक्ष वेधले.

गारपीट आणि अवकाळी पावसामुळे राज्यातील सुमारे ३ लाख ९३ हजार हेक्टर जमिनीवरील पिकांचे नुकसान झाले आहे. त्यातून शेतकरी अडचणीत आला आहे. या शेतकर्‍यांना केंद्र सरकारकडून भरीव मदत मिळावी, त्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारकडून येणार्‍या प्रस्तावाला तातडीने मंजुरी द्यावी, अशी मागणी खासदार महाडिक यांनी राज्यसभेत बोलताना केली.

नवी दिल्लीत सुरू झालेल्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनात आज पहिल्याच दिवशी, खासदार धनंजय महाडिक यांनी, राज्यातील शेतकर्‍यांच्या समस्येला वाचा फोडली. गारपीट आणि अवकाळी पावसामुळे राज्यातील ३ लाख ९३ हजार ३२५ हेक्टर जमिनीवरील पिकांचे नुकसान झाले आहे. प्रामुख्याने उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आणि कोकणातील २१ जिल्हयातील शेतकर्‍यांना अवकाळीचा फटका बसला आहे.

अशा परिस्थितीत राज्य सरकारकडून केंद्र सरकारकडे येणार्‍या प्रस्तावाला लवकरात लवकर मंजुरी मिळावी आणि नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना भरपाई मिळावी, अशी मागणी खासदार महाडिक यांनी राज्यसभेत बोलताना केली. राज्यातील ९६ तालुक्यातील शेतकर्‍यांचे गारपीट आणि अवकाळीमुळे कंबरडे मोडले आहे.

३३ टक्क्यापेक्षा अधिक नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना नियमानुसार सरकारकडून लवकरात लवकर मदत दिली जावी, अशी मागणी खासदार महाडिक यांनी केली. त्यामुळे अवकाळीने त्रस्त झालेल्या राज्यातील सर्व शेतकर्‍यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *