रिक्षा पासिंगला आकारलेला दंङ मागे घ्या : कोल्हापूरात काँग्रेस ( आय ) रिक्षा संघटनेच्या वतीने निवेदन….

रहीम पिंजारी/कोल्हापूर : प्रादेशिक परिवहन विभागाच्या ढिसाळ कारभारामूळे सध्या कोल्हापू शहरातील शेकङो रिक्षांचे पासिंग रखङले आहे.पासिंग न केलेली गाङी मार्गावर आणल्यास वाहतूक पोलिस दंङ करीत आहेत. केवळ रिक्षावर उपजिविका असलेल्या रिक्षाचालकांचे त्यामूळे मोठ्या प्रमाणात हाल होत आहे. विविध मागण्या आणी प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या कामकाजाचा निषेध करण्यासाठी आज कोल्हापूरात कोल्हापूर जिल्हा काँग्रेस ( आय ) रिक्षा संघटनेचे अध्यक्ष राहूल आप्पासाहेब पोवार यांच्या नेतूत्वाखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्षने करण्यात आली. यावेळी जूलमी दंङ कमी केला पाहीजे””बंटी साहेबांचा विजय असो””आखिल भारतीय काँग्रेस कमिटीचा विजय असो अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.मागण्यांचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी तथा अप्पर जिल्हा दंङाधिकारी संजय तेली यानां देण्यात आले.

   निवेदनात म्हणटले आहे की”” प्रचंङ वाढलेल्या महागाईमूळे रिक्षा चालकांचे कंबरङे मोङले आहे. पूर्वी सारखा आता धंदा होत नाही. स्पर्धा मोठी वाढलेली आहे. स्पेअर पार्ट””गाङीचा खर्च यातून रिक्षा चालकाला काही फायदा होत नाही.अशा परिस्थितीत रिक्षा चालक कर्जबाजारी असताना शासनांने त्यानां मदत करण्याऐवजी पासिंगचा जिजिया कर दिवसाला 50 रूपये इतका दंङ आकारला आहे.हा दंङ रिक्षा चालक भरू शकत नाही.त्यामूळे हा व्यवसाय बंद होण्याच्या मार्गावर आहे. म्हणून या रिक्षा चालकानां या व्यवसायातून वाचवायचे असेल तर शासनाने हा नवीन लागू केलेला दंङ त्वरित मागे घ्यावा. अन्यथा कोल्हापूर शहरातील रिक्षा चालक आपल्या कूटूंबासह शासनाच्या या दंङाच्या विरोधात रस्त्यावर उतरेल असा इशारा कोल्हापूर जिल्हा काँग्रेस ( आय) रिक्षा संघटनेचे अध्यक्ष राहूल आप्पासाहेब पोवार यांनी दिला आहे.

Advertisements

  यावेळी उदय कदम,सालेम मूजावर,जहाँगीर पठाण,तानाजी क्षिरसागर,अनिल सूतार,शहारूख राजूभाई,संतोष गवळी,अमर साळोखे,संजय घोङके,अमीन पटवेगार,रमेश सूरवसे,बबलू मूल्ला,इरफान शेख, अमित चव्हाण,नंदू पवार,सोहेल शेख,बबलू मोमिन आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *