INDvsPAK : पण शेवटी टीम इंडियाने बाजी मारली…..

न्यूयॉर्कच्या नासाऊ काउंटी इंटरनॅशनल स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा ६ धावांनी पराभव केला.विश्वचषकातील लो स्कोअरिंग सामन्यात भारताने दुसऱ्या विजयाची नोंद केली. पाकिस्तानचा पराभव करत भारताने सुपर ८ च्या दिशेने पाऊल टाकले आहे. पण भारतीय गोलंदाजांनी हार मानली नाही आणि जिद्द ठेवली. हळूहळू भारतीय गोलंदाजांनी कमाल दाखवायला सुरुवात केली आणि सामना भारताच्या बाजूने जाऊ लागला. जसप्रीत बुमराहने बाबर आझमच्या रूपाने भारताला पहिले यश मिळवून दिले. त्यानंतर अक्षर पटेलने उस्मान खानला बॉलिंग करून पाकिस्तानला दुसरा धक्का दिला. यानंतर हार्दिकने फखर जमानला बाद करून भारताच्या झोळीत तिसरी विकेट घेतली आणि सर्वात महत्त्वाचे यश भारताला मोहम्मद रिझवानच्या रूपाने बुमराहने मिळवून दिले, जिथून संपूर्ण सामना उलटला. रिझवानच्या रूपाने पाकिस्तानने चौथी विकेट गमावली. सेटचा फलंदाज रिझवान बाद होताच पाकिस्तानचा संघ गडबडला. त्याचप्रमाणे भारतीय गोलंदाजांनी सलग विकेट घेत भारताला विजय मिळवून दिला.

भारतीय संघाने पाकिस्तानसमोर १२० धावांचे लक्ष्याचा यशस्वीपणे बचाव केला. याआधी टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात भारताने इतक्या लहान धावसंख्येचा बचाव केला नव्हता. भारतीय संघाने २०१६ मध्ये झिम्बाब्वेविरुद्धच्या टी-२० सामन्यात १३९ धावांच्या लक्ष्याचा बचाव केला होता. पण आता भारताने हा विक्रम मागे टाकला आहे.भारताकडून सर्वात यशस्वी गोलंदाज जसप्रीत बुमराह ठरला. जसप्रीत बुमराह यानं ४ षटकात फक्त १४ धावा खर्च करत तीन फलंदाजांना तंबूत धाडले. बुमराहने बाबर आझम, मोहम्मद रिझवान आणि इफ्तिखार अहमद यांना बाद केले. हार्दिक पांड्याने चार षटकात २४ धावा खर्च करत दोन विकेट घेतल्या. अर्शदीप सिंह आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतली.पाकिस्तानला ४८ चेंडूत फक्त ४८ धावांची गरज होती. सामना पाकिस्तान जिंकणार असेच सर्वांना वाटत होतो. पण १५ व्या षटकात जसप्रीत बुमराहने रिझवानचा त्रिफाळा उडवला अन् भारताच्या विजयाच्या आशा जिवंत केल्या. रिझवानची विकेट हाच सामन्याचा टर्निंग पॉइंट ठरला. पण भारतीय गोलंदाजांनी हार मानली नाही आणि जिद्द ठेवली. हळूहळू भारतीय गोलंदाजांनी कमाल दाखवायला सुरुवात केली आणि सामना भारताच्या बाजूने जाऊ लागला. जसप्रीत बुमराहने बाबर आझमच्या रूपाने भारताला पहिले यश मिळवून दिले. त्यानंतर अक्षर पटेलने उस्मान खानला बॉलिंग करून पाकिस्तानला दुसरा धक्का दिला. यानंतर हार्दिकने फखर जमानला बाद करून भारताच्या झोळीत तिसरी विकेट घेतली आणि सर्वात महत्त्वाचे यश भारताला मोहम्मद रिझवानच्या रूपाने बुमराहने मिळवून दिले, जिथून संपूर्ण सामना उलटला. रिझवानच्या रूपाने पाकिस्तानने चौथी विकेट गमावली. सेटचा फलंदाज रिझवान बाद होताच पाकिस्तानचा संघ गडबडला. त्याचप्रमाणे भारतीय गोलंदाजांनी सलग विकेट घेत भारताला विजय मिळवून दिला.

Advertisements

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *