कोल्हापूर : टोळी युद्धातून तरुणाची हत्या…

कोल्हापूर : शहरातील संभाजीनगर परिसरात टोळी युद्धातून गुरुवारी दुपारी पाठलाग करून तलवार व एडक्याचे सपासप वार करून सुजल बाबासो कांबळे वय 20, वारे वसाहत, कोल्हापूर याची आठ ते दहा जणांनी निर्घृण हत्या केली. मृताच्या नातेवाईकांनी व मित्रांनी सीपीआर परीसरात मोठी गर्दी केली आहे.

 

  प्राथमिक मिळालेली माहिती अशी की आठ दिवसापूर्वी सुजल आणि त्याच्या मित्रांचा त्याच्या विरोधी टोळी मध्ये रील्स वरून वाद झालेला होता.त्या वादातूनच सुजलचा खून झाला असल्याची माहिती समोर येत आहे.आज दुपारी सुजल मित्रांसोबत जोशीनगरातील चौकात गप्पा मारत बसलेला यावेळी हल्लेखोरांनी सुजलला टार्गेट केले हल्ला करून संशयित तेथून पळून गेले. त्यानंतर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या सुजलला मित्रांनी दुचाकीवरून सीपीआरमध्ये दाखल केले.पशहर पोलीस उपाधीक्षक अजित टिके, जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्यासह पोलिसांचा मोठं फौजफाटा सीपीआरमध्ये दाखल झाला.

Advertisements

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *