कोल्हापूर : गारगोटीत जलजीवन मिशन हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प साकारला जात असून वितरण नलिकाअंतर्गत नळ जोडणी, चार लाख लिटर क्षमतेचा जलकुंभ आदी ८० टक्के कामे पूर्ण झाली आहेत. या प्रकल्पासाठी गट क्रमांक २३५ गायरान जमिनीतील वीस गुंठे जागा मिळावी, अशी मागणी दीड वर्षांपूर्वी जिल्हा प्रशासनाकडे केली होती. या जागे साठी सही करण्यासाठी अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी १० लाख रुपयाची मागणी केली आहे, असा आरोप भाजपाचे जिल्हा सदस्य नाथाजी पाटील यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केला. त्यांनी हा प्रश्न आठ दिवसांमध्ये मार्गी न लावल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला.
कोल्हापुरात अप्पर जिल्हाधिकाऱ्यांकडून जागा हस्तांतरणासाठी १० लाखाची मागणी : भाजपचे आरोप
