युवकांनी शेतीकडे वळणे आवश्यक: रुरल चेंबर ऑफ कॉमर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष अतुल घुईखेडकर यांचे प्रतिपादन.

 

कोल्हापूर /प्रतिनिधी : “देशात ६२ टक्के युवा वर्ग आहे. त्यातील जास्तीत जास्त युवा वर्ग हा ग्रामीण भागामध्ये राहतो. ग्रामीण भागामध्ये युवकांनी शेतीकडे वळणे आवश्यक आहे. तसेच शेतीवरील प्रक्रिया उद्योगामध्ये उतरावे. जेणेकरून आपले उत्पन्न तिपटीने आपण वाढवू शकतो. असा सल्ला रुरल चेंबर ऑफ कॉमर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष अतुल घोईखेडकर यांनी दिला. कोल्हापुरात उद्योजकांसाठी आयोजित चर्चासत्रात ते मार्गदर्शन करताना बोलत होते. सिक्कीम हे राज्य ऑरगॅनिक राज्य म्हणून जाहीर करण्यात आलेले आहे.

आपला महाराष्ट्र हा शेतीप्रधान आहे. पण तरुणांची मानसिकता चुकीच्या पद्धतीने तयार केली गेली आहे. ग्रामीण भागात कौशल्य आधारित काम करणारे लोक आहेत, पण त्यांची मानसिकता बदलणे गरजेचे आहे.” “प्रगती करायची असेल, तर सूक्ष्म नियोजन करून उद्योग सुरू करा. तरुण शेतकऱ्यांनी लहान-मोठ्या उद्योगाद्वारे हळद, धणे, पावडर, मसाले, लोणचे, डाळी, शूज आदी उत्पादने तयार करावीत. रुरल चेंबर ऑफ कॉमर्स ऑफ इंडिया नेहमीच त्यांना सहकार्य करेल व त्यांना मार्गदर्शन करेल अशी ग्वाही देखील अतुल घो ईखेडकर यांनी यावेळी दिली. “कोल्हापूर जिल्ह्याचे हवामान चांगले आहे. येथे कृषीपूरक तसेच प्रक्रिया उद्योगाद्वारे अनेक व्यवसाय करताय येतील.प्रक्रिया उद्योगाबरोबरच ग्रामीण भागामध्ये सेवा देणे या उद्योगाला देखील मोठी संधी आहे. हा जिल्हा या उद्योगाचे केंद्र बनू शकतो. “

Advertisements


जिल्ह्यातील शेतमालाला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ही चळवळ व्यापक करून तरुणांना उद्योगधंद्यांकडे आकर्षित करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत असे रूरल चेंबर ऑफ कॉमर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष अतुल घुईखेडकर म्हणाले.

महाराष्ट्रातील नव उद्योजकांनी स्वतः छोटेमोठे उद्योग सुरू करावेत आणि ते व्यवस्थित चालावेत, त्यांनी निर्माण केलेल्या उत्पादनांना चांगली बाजारपेठ उप करून द्यावी, यासाठी रूरल चेंबर ऑफ कॉमर्सने चळवळ केली आहे.ग्रामीण क्षेत्र २०५० पर्यंत शहरीकरणात रुपांतरित होणार असल्याने भविष्यात तरुण उद्योजकांनी त्यानुसार पुढील आव्हान पेलण्यासाठी सज्ज राहावे, असे आवाहन यावेळी अतुल घुईखेडेकर यांनी केले.
यावेळी रुरल चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष मोहन माने यांनी आभार कार्यक्रमास सदस्य भवानीसिंग घोरपडे, अजय सिंग, बाबासाहेब जांभळे, योगेश फोंडे ,अभिषेक सिंग उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *