राज्याबाहेर जाणाऱ्या व राज्याबाहेरुन येणाऱ्या ४३ हजार ४४३ व्यक्ती : जिल्हाधिकारी दौलत देसाई

कोल्हापूर प्रतिनिधी रोहित वज्रमट्टी : लॉकडाऊनमुळे जिल्ह्यात अडकलेल्या राज्याबाहेर जाणाऱ्या आणि राज्याबाहेरुन जिल्हयात येणाऱ्या ४३ हजार ४४३ व्यक्ती, तर महाराष्ट्र राज्यातील अन्य जिल्हयामध्ये जाणाऱ्या आणि महाराष्ट्रातील अन्य जिल्हयामधुन येणाऱ्या १९ हजार १४९ व्यक्ती असल्याची माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली.

 जिल्हयातून राज्याबाहेर जाणाऱ्या आणि राज्याबाहेरुन जिल्हयात येणाऱ्या ४३ हजार ४४३ व्यक्तींमध्ये राज्याबाहेर जाणाऱ्या ४२ हजार १४४ तर राज्याबाहेरुन जिल्हयात येणाऱ्या १ हजार २९९ व्यक्तींचा समावेश आहे.
तसेच महाराष्ट्र राज्यातील अन्य जिल्हयामध्ये जाणाऱ्या
आणि महाराष्ट्रातील अन्य जिल्हयामधुन येणाऱ्या ११ हजार ४५५ व्यक्तींमध्ये महाराष्ट्र राज्यातील अन्य जिल्हयामध्ये जाणाऱ्या ७ हजार ६९४ तर महाराष्ट्रातील अन्य जिल्हयामधुन येणाऱ्या १९ हजार १४९ व्यक्तींचा समावेश असल्याचेही जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *