सामाजिक समरसता मंचामार्फत कोल्हापुरात ‘बंधुता परिषद’ 

1 0

Share Now

Read Time:5 Minute, 38 Second

Media control news network 

कोल्हापूर प्रतिनिधी, २ जानेवारी १९४० रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कराड येथील शाखेस भेट दिल्याच्या निमित्ताने गेल्या काही वर्षांपासून ‘बंधुता परिषद’ आयोजित करण्यात येते. या वर्षी प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. मच्छिंद्र सकटे (अध्यक्ष, दलीत महासंघ), ॲड. क्षितिज टेक्सास गायकवाड (विश्वस्त, देहूरोड धम्मभूमी ट्रस्ट) हे उपस्थित होते. श्री. संदीप कांबळे यांनी बुद्धवंदना व सांघिक गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यानंतर संविधान उद्देशिका वाचन करण्यात आले. रा. स्व. संघाचे डॉ. राजेश पवार यांनी प्रास्ताविक व पाहुण्यांचे परिचय करून दिले.

” डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कराडच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शाखेला भेट दिल्याचे माहित असूनही एवढे दिवस गप्प का होते कारण त्याचा पुरावा फक्त केसरी या वृत्तपत्रांमध्येच छापून आल्याची नोंद आपल्याकडे होती आणि ते वृत्तपत्र लोकमान्य टिळक चालवायचे. जेव्हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जनता नावाच्या पत्रकामध्ये या बातमीची नोंद सापडली त्यानंतरच आपण २ जानेवारी १९४० या दिवसाचा गौरव करायचे ठरवले.”

“डॉ. बाबासाहेबांचं देशावर प्रचंड प्रेम होतं. त्यामुळे त्यांनी या भारतीय मातीमधील बौद्ध धर्म स्वीकारला. आज लोकांच्या घरातील हॉलपर्यंत बुद्ध आलाय, उद्या लोकांच्या मनात येईल. शांत राहून गोष्टीना सामोर गेल पाहिजे. प्रत्येकाला बुद्ध कळणार आहेत. ” – क्षितिज टेक्सास गायकवाड

“या बंधुता परिषदा महाराष्ट्रभर झाल्या पाहिजेत आणि देशभर झाल्या पाहिजेत. ज्यांच्या विरुद्ध आम्ही भांडतोय ते हिंदुत्ववादी बंधुता द्यायला तयार आहेत तर घ्यायची सोडून वाद का घालत बसलाय ? मागच्या दोन बंधुता परिषदांना मी उपस्थित होतो. मला ट्रोल केल गेल.. मला ट्रोल केल तर मी स्क्रोल करेल. RSS ही ब्राम्हणांची संघटना अस वाटणाऱ्यात मी पण एक होतो. गेल्या जानेवारी पासून माझा यांच्याशी संबंध आला. आणि आता मी या निष्कर्षाला आलो आहे की RSS (राष्ट्रीय स्वयंसेवक संघ) ही फक्त ब्राम्हणांची नाही तर पूर्ण देशाची संघटना आहे. भारतामध्ये जेवढे जातीसमूह आहेत त्याचे प्रतिनिधी RSS (राष्ट्रीय स्वयंसेवक संघ) मध्ये आहेत. महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये दलितांमधले पूर्वाश्रमीचे महार RSS (राष्ट्रीय स्वयंसेवक संघ) मध्ये आहेत. मी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज, महात्मा फुले, लहुजी वस्ताद, अण्णाभाऊ साठे, मुक्ता साळवे यांचा विचारांचा कट्टर समर्थक आहे. पण माझ्या वाचनातून मी आता डॉ. हेडगेवारांचा विरोधक राहिलेलो नाही. मी स्वतः RSS (राष्ट्रीय स्वयंसेवक संघ) कडे आपुलकीने पहायला लागलोय. कारण २ जानेवारी १९४० ला जेव्हा बाबासाहेबांनी संघाच्या कराड शाखेला भेट दिली होती तेव्हा ते म्हणाले होते – ” काही बाबतीत मतभेद असले तरी मी या संघाकडे आपलेपणाने पाहतो ” – डॉ. बाबासाहेब आंबेडकर (२ जानेवारी १९४०, कराड). आणि मच्छिंद्र सकटे सुद्धा संघाकडे आपुलकीने आणि जिव्हाळ्याने पाहतोय….”- प्रा. मच्छिंद्र सकटे 

विजय पुजारी यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी मंचावर डॉ. राजेश पवार, प्रा. भिसे, श्रीमती वसुधा वसंतराव शिर्के, ॲड. क्षितिज टेक्सास गायकवाड आणि प्रा. मच्छिंद्र सकटे उपस्थित होते. सामाजिक समरसता मंचाचे सुनील वांकर यांनी आभार प्रदर्शन केले. या परिषदेसाठी रा. स्व. संघाचे प्रमोदराव ढोले, केदार जोशी, कैलास काईगडे, रवी मिसाळ, अमर कांबळे, तानाजी रावळ, स्वप्नील नाईक, विद्या कामत, किशोर गायकवाड यांचे सहकार्य लाभले.

जाहिरात जाहिरात जाहिरात जाहिरात 

Happy
Happy
50 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
50 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *