कागलमध्ये शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते जल व दुग्धाभिषेक

कोल्हापूर विशेष प्रतिनिधी सुलोचना नार्वेकर : कागलमध्ये शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी येथील नगरपालिकेच्या प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन व पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तसेच मंत्री श्री. मुश्रीफ यांनी पुतळ्याला जल आणि दुधाचा अभिषेक घातला. यावेळी “छत्रपती शिवाजी महाराज की जय” या घोषणांनी आसमंत दुमदुमून गेला.
यानंतर बसस्थानक परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह प्रमुख मान्यवरांच्या हस्ते पूजन झाले व अभिवादन करण्यात आले.

यावेळी माजी नगराध्यक्ष रमेश माळी,उपनगराध्यक्ष सतीश घाडगे,नितीन दिंडे, प्रविण काळबर,बाबासाहेब नाईक, आनंदा पसारे,संजय चितारी,संग्राम लाड, बच्चन कांबळे,रवी मर्दाने कागल पोलीस प्रमुख दत्तात्रय नाळे, मुख्याधिकारी पंडितराव पाटील आदी प्रमुख उपस्थित होते.

Advertisements

 

 

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *