बेरोजगार युवक युवतींसाठी २५ व २६ जून रोजी ऑनलाईन रोजगार मेळावा : सहाय्यक आयुक्त एस. के. माळी

0 0

Share Now

Read Time:3 Minute, 39 Second

सांगली प्रतिनिधी संतोष कुरणे  : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे असंख्य परप्रांतीय कामगारांचे स्थलांतर झाले. त्यामुळे आता अनलॉक  १  अंतर्गत काही अटी व शर्तीच्या आधारे सुरू झालेल्या औद्योगिक कंपन्यांना मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाची कमतरता भासत आहे.

या अनुषंगाने जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदशन केंद्र, सांगली कार्यालयाच्या वतीने नोकरी इच्छुक बेरोजगार युवक युवतींसाठी दिंनाक २५ व २६ जून २०२० रोजी ऑनलाईन रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. तरी इच्छुक युवक युवतींनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदशन केंद्राचे सहाय्यक आयुक्त एस. के. माळी यांनी केले आहे.

या ऑनलाईन रोजगार मेळाव्यांतर्गत सांगली जिल्ह्यातील नामवंत विविध उद्योजकांकडील सर्व साधारणपणे वेल्डर, फिटर, टर्नर, इंजिनिअरींग डिप्लोमा या सारख्या पदांसाठी आवश्यक ती पात्रताधारक तसेच इयत्ता ७ वी ते ९ वी, एसएससी, एचएससी, पदवीधर उमेदवारांसाठी एकूण १५० पेक्षा अधिक रिक्तपदे उपलब्ध करून देण्यात आली आहेत.

हा मेळावा केवळ ऑनलाईन पसंतीक्रम नोंदविणाऱ्या उमेदवारांसाठीच घेण्यात येणार आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी या संधीचा लाभ घेण्यासाठी आपल्या युजर आयडी व पासवर्डच्या आधारे कौशल्य विकास विभागाच्या http://mahaswayam.gov.in या संकेत स्थळाव्दारे लॉगीन करून  आपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार उचित असलेल्या रिक्तपदांसाठी आपला पसंतीक्रम व उत्सुकता ऑनलाईन पध्दतीने नोंदवावी.

पसंतीक्रम नोंदविताना शक्यतो आपण वास्तव्यास असलेल्या ठिकाणच्या आसपासच्या कंपनीची तसेच आवश्यक पात्रता धारण करीत असल्याची खात्री करून पदाची निवड करण्याची दक्षता घ्यावी, जेणेकरून कोरोनाच्या प्रार्दुभावामुळे शासनाने विहीत केलेल्या अटी व शर्तीचे पालन करणे व संधीचा लाभ घेणे, उद्योजक व उमेदवार या उभयतांना सहज शक्य होईल, असे आवाहनही श्री. माळी यांनी केले आहे.

इच्छुक युवक युवतींनी दिनांक २२ जून पर्यंत आपले पसंतीक्रम नोंदवून याचा लाभ घ्यावा. पसंतीक्रम नोंदविणाऱ्या उमेदवारांना त्यांच्या पसंतीक्रमानुसार व उद्योजकांच्या सोयीनुसार त्यांच्या मुलाखतीचे ठिकाण, दिनांक व वेळ एसएमएस अलर्टव्दारे कळविण्यात येईल व शक्य असेल तिथे ऑनलाईन किंवा ऑफ लाईन मुलाखतीचे आयोजन करण्यात येईल, असे श्री. माळी यांनी सांगितले.

 

 

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *