पडळकर माफी मागा अन्यथा कोल्हापूरी हिसका दाखवू : राष्ट्रवादीचा इशारा

0 0
Getting your Trinity Audio player ready...

Share Now

Read Time:3 Minute, 3 Second

कोल्हापूर विशेष प्रतिनिधी सुलोचना नार्वेकर :  आपली लायकी आणि कुवतीपेक्षा जास्त वायफळ बडबड करणाऱ्या गोपीचंद पडळकर यांनी तातडीने शरद पवारसाहेबांची माफी मागावी अन्यथा त्यांना कोल्हापुरी हिसका दाखवू , असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसने प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे.

या पत्रकावर जिल्हाध्यक्ष ए.वाय. पाटील, शहराध्यक्ष आर. के. पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस प्रताप उर्फ भैय्या माने, राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष नवीद मुश्रीफ, सरचिटणीस अनिल साळुंखे आदींच्या सह्या आहेत.

निवेदनात पुढे म्हटले आहे,  मुळात गोपीचंद पडळकर यांनी वापरलेली खालच्या पातळीवरील भाषा ही महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला कलंकच आहे. पडळकर यांचे जेवढे वय आहे, त्याच्या दुप्पट वर्ष पवारसाहेबांनी राजकारण, समाजकारण आणि बहुजनांच्या कल्याणार्थ खर्च केली आहेत. त्यांची ही भाषा आणि प्रवृत्ती म्हणजे सूर्यावर थुकण्याचाच प्रकार आहे. शरद पवारसाहेब यांच्यावर बोलताना त्यांनी आपलं वय, सामाजिक कर्तुत्व आणि समाजकारण- राजकारणातील योगदान किती, याचेही भान ठेवायला हवं होतं.

गोपीचंद पडळकर यांचे आता जे वय आहे,  त्या वयात शरद पवारसाहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. उभी हयात त्यांनी महाराष्ट्राच्या आणि विशेषता बहुजन समाजाच्या विकासासाठी खर्च केली आहे. असेही या पत्रकात म्हटले आहे.

 

 गोपीचंद पडळकर म्हणजे धनगर समाजाला        लागलेला शापच

   गोपीचंद पडळकर यांनी आमदारकीसाठी समस्त धनगर समाजाशी प्रतारणा केली. धनगर समाजाला वाऱ्यावर सोडून, त्यांनी त्यांचा घोर विश्वासघात केला. त्यांनी केलेल्या धनगर समाजाच्या या विश्वासघाताची आणि प्रतारणा यांची नोंद इतिहासात होईल, एवढं मोठं काम त्यांनी केलंय.

म्हणूनच गोपीचंद पडळकर हा एक समस्त धनगर समाजावर लागलेला शापच आहे. असे पत्रकातून म्हणत कोल्हापूर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पडळकरांच्या वक्तव्याबद्दल निषेध करण्यात आला .

 

 

 

 

 

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *