पंतप्रधान स्वनिधी योजनेसाठी फेरीवाला नोंदणीस उत्साहात सुरुवात

0 0
Getting your Trinity Audio player ready...

Share Now

Read Time:3 Minute, 26 Second

कोल्हापूर शिवाजी शिंगे : भाजपा फेरीवाले आघाडी आयोजित केंद्र सरकारच्या फेरीवाल्यांना अर्थ सहाय्यासाठी घोषित झालेल्या पंतप्रधान स्वनिधी योजनेसाठी, फेरीवाल्यांच्या ऑनलाईन नोंदणीस आज उत्साहात प्रारंभ झाला.

कोरोना लॉकडाऊनमुळे गरीब आणि कष्टकरी वर्गास मोठा फटका बसला आहे. अनेकांचे उत्पन्न थांबले आहे. त्यामुळे अशा वर्गास केंद्र शासनाने मोठ्या प्रमाणावर आर्थिक सहाय्य घोषित केले आहे. रस्त्यावर वस्तू विक्री करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविणाऱ्या फेरीवाल्यांना ही या लॉकडाऊन चा जबर फटका बसला. त्यांच्या करिता खेळत्या भांडवलाची सोय व्हावी, म्हणून केंद्र सरकारने पंतप्रधान स्वनिधी योजनेची घोषणा केली.

या योजनेअंतर्गत सर्व फेरीवाल्यांना राष्ट्रीयकृत बँका, शेड्युल्ड बँका व स्थानिक कोऑपरेटिव्ह बँका यांच्या माध्यमातून दहा हजार रुपयापर्यंत विनातारण कर्ज पुरवठा होणार आहे. या योजनेसाठी सर्व फेरीवाल्यांनी ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे.

भारतीय जनता पार्टी फेरीवाला संघटनेने ही नोंदणी करण्याची व्यवस्था केली आहे देवस्थान व्यवस्थापन समिती पश्चिम महाराष्ट्र चे अध्यक्ष महेश जाधव आणि भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे यांचे हस्ते  दोन फेरीवाल्यांची नोंदणी करून या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.

यावेळी बोलताना महेश जाधव यांनी केंद्र शासनाने गोरगरीब जनतेसाठी सुरू केलेल्या अनेक योजनांची माहिती दिली. आणि या योजनेचा सर्व फेरीवाल्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन केले. राहुल चिकोडे यांनी बोलताना फेरीवाला आघाडीच्या उपक्रमाचे कौतुक केले व हा उपक्रम शहरातील सर्व फेरीवाल्यांपर्यंत पोहचला पाहिजे असे प्रतिपादन केले.

भाजपाचे गटनेते अजित ठाणेकर यांनी या नोंदणीची प्रक्रिया व नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रांची माहिती उपस्थितांना दिली.

या नोंदणी उपक्रमाचे आयोजन मारुती भागोजी, महेश उरसाल, नजीर देसाई, अशोक लोहार यांनी केले आहे. ज्यांना आपली नावे नोंदवायची असतील त्यांनी नगरसेवक अजित ठाणेकर यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन भाजपा फेरीवाले आघाडी तर्फे करण्यात आले.

या कार्यक्रमास ऋतुराज नढाळे,  योगेश जोशी,  नितीन सांगवडेकर,  संतोष जोशी यांचे सहकार्य लाभले.

 

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *