Share Now
Read Time:1 Minute, 5 Second
मिडिया कंट्रोल न्युज नेटवर्क : बॉलिवूड चे महानायक अभिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती त्यांनीच ट्विटरच्या माध्यमातून दिली.
त्यांच्यावर नानावटी रूग्णालयात उपचार सुरू असून आता त्यांची प्रकृती स्थिर आहे.
अभिताभ बच्चन यांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आल्याचे निष्पन्न होताच त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींची व त्यांच्या संपर्कातील व्यक्तींची कोरोना चाचणी करण्यात आली होती. यामध्ये अभिषेक बच्चन यांचाही रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचे काल रात्री उशिरा निदर्शनास आले.
अभिषेक यांचीही प्रकृती ठीक असल्याचे अभिषेक यांनी ट्विटरद्वारे म्हंटले आहे.
Share Now