Getting your Trinity Audio player ready...
|
कोल्हापूर प्रतिनिधी जावेद देवडी : शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री.उद्धव ठाकरे यांच्या संयमी व कुशल नेतृत्वाने महाराष्ट्र राज्य प्रशासन गेले चार महिने कोरोनाच्या महासंकटाशी लढा देत असून, कोरोना लढ्यात अविरत कार्यरत असणारे सर्वच योद्धे अभिनंदनास पात्र आहेत.
८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण ही शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेल्या शिकवणीनुसार सर्व शिवसैनिक काम करत असून, शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री.उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सीपीआर रुग्णालयास विशेष निधीतून रु.१ कोटींच्या बेड व कपाटे या साहित्यांचे वितरण करून शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना अभिप्रेत असणारे सामाजिक कामाद्वारे वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
गेल्या दहा वर्षात सीपीआर रुग्णालयात विविध उपक्रम राबवून नवसंजीवनी देण्यास यशस्वी झालो आहे. आजच्या उपक्रमातून नक्कीच सीपीआर रुग्णालयातील उपचार पद्धतीस गती मिळून त्याचा फायदा तत्पर रुग्णसेवेस होणार असल्याचे प्रतिपादन राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी केले.
कोरोना महामारीचे संकट देशासह राज्यावर घोंगावत असताना शिवसेना पक्षप्रमुख व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री.उद्धव ठाकरे यांनी वाढदिवस साजरा न करता कोरोना विरुद्धच्या लढाईसाठी सामाजिक उपक्रम राबविण्याचे आवाहन तमाम शिवसैनिकांना केले आहे.
या आवाहनानुसार राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री राजेश क्षीरसागर यांच्या विशेष प्रयत्नातून शासनाच्या ४२१७ या हेडमधून मंजूर झालेल्या रु.१ कोटींच्या निधीतून छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय (सीपीआर) येथे खाटांचे (बेड) व कपाटे साहित्य प्रदान करण्यात आले.
यावेळी बोलताना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री.उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रुग्णालये सुसज्ज असणे, ही काळाची गरज आहे. गेल्या दहा दिवसात कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील कोरोना रुग्ण संख्येचा वाढता आलेख पाहता, आरोग्य यंत्रणेच्या मर्यादा स्पष्ट होताना दिसत आहेत. कोरोनाच्या महामारीने आरोग्य यंत्रणा सक्षम करण्याची गरज जाणवते. त्यामुळे सामाजिक भान जपून शिवसेना पक्षप्रमुख, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री.उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सीपीआर रुग्णालयास रु.१ कोटींचे खाट आणि कपाटे उपलब्ध करून आरोग्य यंत्रणेस बळकटी देण्याचे काम केले आहे.
यावेळी बोलताना आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांनी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी सामाजिक भावनेतून केलेला बेड व कपाटे वितरणाचा कार्यक्रम स्तुत्य आहे.
गेल्या दहा वर्षात त्यांच्या माध्यमातून कोल्हापूर शहरातील विविध विकास कामे, सुधारणा यासह सीपीआर रुग्णालयाच्या सुधारणेत केलेले काम हे त्यांच्या कार्याची पोहचपावती देते.
कोरोनाच्या संकटकाळात जिल्हा प्रशासन, महापालिका प्रशासन या सर्वांना त्यांचे मोलाचे सहकार्य असून, अशा विविध उपक्रमातून ते जनसेवेचे व्रत पार पाडत आहेत. कोरोना विरुद्धच्या लढ्यात त्यांनी वेळोवेळी पुढाकार घेतला असून, आरोग्य यंत्रणा सक्षम करण्याचे काम केले आहे. गेल्याच महिन्यात त्यांच्या माध्यमातून सीपीआर रुग्णालयास स्वतंत्र कोरोना वॉर्ड देणगी स्वरूपात देण्याचा उपक्रम पार पडला तर आज रु.१ कोटींचे बेड आणि कपाटे प्रदान करण्यात आली आहेत. आरोग्य यंत्रणेस त्यांच्या कडून होत असलेल्या मदतीबद्दल प्रशासनाच्या वतीने आम्ही राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांचे आभार मानतो. असे डॉ. कलशेट्टी म्हणाले.
या कार्यक्रमास पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या कोषाध्यक्षा सौ.वैशाली क्षीरसागर, को.म.न.पा. आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी, अधिष्ठाता डॉ.सौ.आरती घोरपडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.बी.सी.केम्पीपाटील, डॉ.अजित लोकरे, अभ्यागत समिती सदस्य सुनील करंबे, शशिकांत रावळ- वाघमारे, महेंद्र चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना आय