संजय गांधी निराधार समितीच्या अध्यक्षपदी भैय्या माने यांची निवड

कोल्हापूर प्रतिनिधी: शरद माळी

कागल तालुका संजय गांधी निराधार योजना समितीच्या अध्यक्षपदी प्रताप उर्फ भैय्या यशवंतराव माने यांची निवड झाली. या निवडीचे पत्र श्री. माने यांना जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी पाठविले आहे.

श्री. देसाई यांनी नियुक्त केलेल्या या कार्यकारिणीमध्ये अध्यक्ष म्हणून यापूर्वी काम पाहिलेल्या श्री. माने यांच्यासह समिती सदस्य म्हणून दलितमित्र सदाशिव रामचंद्र बाईत रा. सुरुपली व श्री. सातापा पुंडलिक कांबळे रा. बस्तवडे यांचीही निवड झालेली आहे. उर्वरित कार्यकारिणी सदस्यांची नावेही लवकरच जाहीर होणार आहेत.

जनताभिमुख कामातून गोरगरिबांना न्याय मिळवून देऊ……
याबाबत बोलताना नूतन अध्यक्ष प्रताप उर्फ भैय्या माने म्हणाले, आमचे नेते ग्रामविकास मंत्री हसनसाहेब मुश्रीफ यांनी मला ही संधी दिलेली आहे. यापूर्वीही मला अध्यक्ष म्हणून जी संधी मिळाली होती, त्या माध्यमातूनही वंचितांना न्याय मिळवून देण्याची भूमिका पार पाडली. त्याचपद्धतीने गोरगरीब अंध-अपंग, विधवा, परित्यक्त्या व ६५ वर्षावरील स्त्री-पुरुषांना या माध्यमातून सुखाचे चार घास देऊन त्यांचा विश्वास मी सार्थ ठरवीन.

मागील पाच वर्षात भाजप सरकारच्या काळात अनेक लाभार्थ्यांचे अनुदान बंद झाले आहे. अशा पात्र लाभार्थ्यांची मंत्री श्री. मुश्रीफसाहेब यांनी फेरचौकशी करण्याचे आदेश दिलेले आहेत. अशा निराधारांना प्राधान्याने न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहू. तसेच कागल तालुक्यातील पात्र लाभार्थ्यांना ही योजना सुलभ पद्धतीने मिळवून देण्यासाठी ही प्रक्रिया राबवू. या पद्धतीने या समितीचे काम अधिकाधिक जनताभिमुख करु

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *