Getting your Trinity Audio player ready...
|
कोल्हापूर प्रतिनिधी सतीश चव्हाण : शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना युध्दातील प्रमुख योध्यांचा शिवसेनेच्या वतीने सत्कार करण्यात आला. व जिल्हा न्यायालयासमोर नूतन शिवभोजन थाळीचा शुभारंभ करण्यात आला.
हा सत्कार खासदार संजय मंडलिक , जिल्हा प्रमुख संजय पवार , जिल्हा प्रमुख विजय देवणे , शिवाजीराव जाधव , स्मिता सावंत , प्रास्ताविक युवा सेनेचे जिल्हाधिकारी मंजित माने या मान्यवरांच्या हस्ते झाला.
या सत्कार समारंभात कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त, अधिष्ठता छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय, जिल्हा पोलीस प्रमुख, जिल्हा शल्यचिकिस्तक व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता , कार्यकारी अभियंता व उप अभियंता व छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयातील वरीष्ठ अधिकारी व कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला.
तसेच कोल्हापूर शहरातील शिव भोजन थाळीचे मोफत वाटप करण्यात आले. त्याचप्रमाणे बावडा रोड कोर्टा समोर नुतन शिवभोजन थाळीचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी दत्ताजी टिपुगडे , शशिकांत बिडकर , योगेंद्र माने , नरेश तुळशीकर , चैतन्य अष्टेकर , शेखर बारटक्के , रोहन मांगुरे , अभिनय कानकेकर , विराज भाकरे हे उपस्थित होते. तसेच गडहिंग्लज शिवसेना शाखेच्या वतीने वृक्षारोपण व शिवसेना शाखा आजरा तालुक्याच्या वतीने आजरा बस स्थानक येथे एस.टीतील कर्मचा-यांना अन्नधान्य वाटप करण्यात आले.