पालकमंत्र्यांनी घेतली सी. पी. आर मध्ये तब्बल साडेतीन तास बैठक…

0 0
Getting your Trinity Audio player ready...

Share Now

Read Time:2 Minute, 30 Second

कोल्हापूर : पालकमंत्री सतेज पाटील यांनी सी.पी.आर मध्ये साडेतीन तास बैठक घेतली. सी. पी. आर मधील प्रशासन, बेडची उपलब्धता, ऑक्सीजनेटेड बेड, अत्यवस्थ रुग्णांबाबतचे उपचार, नव्या बेडबाबतचे कामकाज, ऑक्सीजनचा पुरवठा, स्वच्छता या विषयांवर सविस्तर आढावा घेतला.

पालकमंत्री श्री. पाटील यावेळी म्हणाले सी. पी. आर मध्ये येणाऱ्या अत्यवस्थ रुग्णांवर प्राधान्यांने उपचार करुन त्यांना स्टेबल करावे. त्यानंतर महा सैनिक दरबार येथील केंद्रावर संदर्भित करावे. नव्याने करण्यात येणाऱ्या ऑक्सीजनेटेड बेड बाबतचे काम लवकरात लवकर पूर्ण करावेत. आवश्यक ती साधन सामग्रीची उपलब्धता ठेवावी. अत्यवस्थ रुग्णांसाठी 10 बेड ठेवा, अशी सूचनाही त्यांनी केली.

बेड नियोजनासाठी प्रत्येक वार्डमध्ये मोबाईल

सी.पी.आर मध्ये उपलब्ध असणाऱ्या आणि दाखल असणाऱ्या रुग्णांच्या एकत्रित माहितीसाठी तसेच नियोजनसाठी पालकमंत्री श्री. पाटील यांनी प्रत्येक वार्डमध्ये अँड्रॉईड मोबाईल देऊन व्हॉटस ॲप ग्रुप तयार करण्याची सूचना केली. केवळ सूचना न करता पालकमंत्र्यांनी स्वत: मोबाईलवरुन संपर्क साधून 25 मोबाईल आणि सिम कार्ड तात्काळ मागवून घेतले. या ग्रुप वर प्रत्येक वार्ड मधील बेडची माहिती, दाखल झालेले रुग्ण आणि डिस्चार्ज झालेले रुग्ण यांची एकत्रित माहिती नियंत्रण कक्षात मिळणार आहे.
या आढावा बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, अधिष्ठाता चंद्रकांत मस्के, वैद्यकीय अधिक्षक डॉ. तेजस्विनी सांगरुळकर, डॉ. अनिता सैबन्नावर, डॉ. गिरीश कांबळे,जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते,  आदी उपस्थित होते.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *