प्रतिनिधी सुलोचना नार्वेकर
कोल्हापूर : भारतीय जनता पक्षाच्या पश्चिम महाराष्ट्र प्रवक्ते पदी माझी नियुक्ती केल्याबद्दल मी प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांतदादा पाटील, माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस यांचा आभारी आहे. भारतीय जनता पक्षाने मोठ्या विश्वासाने माझ्यावर जबाबदारी सोपवली आहे. त्याला पूर्णपणे न्याय देण्याचा माझा प्रयत्न असेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, आत्मनिर्भर भारताची महत्वाकांक्षी योजना आखली आहे. ही योजना सर्वसामान्य माणसांपर्यंत पोचण्यासाठी मी प्रयत्नशिल राहीन. त्याशिवाय केंद्र सरकारच्या स्तरावर अनेक जनहिताचे आणि देशाच्या दुरगामी धोरणाचे निर्णय होत आहेत. त्याबद्दलची माहिती वेळोवेळी जनतेपर्यंत पोचवण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न असेल. भारतीय जनता पक्ष नेहमीच वैचारिक बैठक घेवून कार्यरत आहे. सामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून, सर्वंकष विकासासाठी नेहमी दक्ष असलेल्या पक्षाच्या ध्येय धोरणांची आणि प्रयत्नांची माहिती व्यापक करण्याचा माझा प्रयत्न असेल. पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी माझ्यावर दिलेल्या जबाबदारीला संपूर्ण न्याय देण्याचा माझा प्रयत्न राहील. तसेच पक्ष संघटन वाढीसाठी सुध्दा मी यथाशक्ती प्रयत्न करेल. पुन्हा एकदा पक्षातील वरिष्ठ नेत्यांचे मी आभार मानतो.