अक्षय ऊर्जा दिन विशेष , लेखक: प्रदीप घाडगे…

0 0
Getting your Trinity Audio player ready...

Share Now

Read Time:7 Minute, 6 Second

 

दि.२० ऑगस्ट हा दिन अक्षय ऊर्जा दिन म्हणून जगभर मानला जातो याचे कारण ही तसे महत्वाचे आहे.
अक्षय म्हणजे न संपणारी व ऊर्जा म्हणजे आज आपण जी वापरतो ती वीज (Electricity)कडून आज आपल्याला मिळणारी ऊर्जा ही कोळसा व नैसर्गिक वायू च्या स्तोत्रतून मिळते.
ही इंधन संपदा अक्षय नाही म्हणजे चिरकाल मिळणारी नाही व संपणारी तर आहेच पण त्यांच्या वापरणे पृथ्वीस हानिकारक अश्या हरितगृह वायूची निर्मिती करते त्यामुळे पर्यावरण दूषित होत आहे.या सर्व गोष्टींचा आज जागतिक पातळीवर विचार व अक्षय ऊर्जेची स्तोत्रं व ऊर्जा निर्मिती कशी करता येईल ज्याचे मूळ पर्यावरणाचे नुकसान तसेच मानव व पशुपक्षी,वण्यजीवन यांना धोखा होणार नाही.
आज आपण आपल्या भारताचा विचार केला तर आपल्याला प्रचंड प्रमाणात घरघुती वापरासाठी, उद्योगधंद्यांना, शेतीसाठी, दळणवळण, खाणकाम, बांधकाम, व इत्तर कारणासाठी विजेची प्रचंड प्रमाणावर गरज आहे,
आपला भारत ह एक विकसनशील देश आहे व वाढत्या लोकसंख्येसाठी सतत वाढणारी गरज पूर्ण करणे हा मुश्किल होत जात आहे. आपल्या कडे फारच कमी ऊर्जा निर्मितीसाठी लागणारी नैसर्गिक स्तोत्रं आहेत व ती जवळ जवळ संपत आली आहेत त्यासाठी आपणास इत्तर देशांच्या वर अवलंबून राहावे लागते कोळसा, गॅस, ऑईल इत्यादी प्रचान प्रमाणात खरेदी करावे लागते पण ते सुद्धा काही वर्षांनी बंद होईल.
त्यासाठी इतर देशांच्या बरोबर अक्षय ऊर्जेची स्तोत्रं शोधत आहे त्यामध्ये अणुऊर्जा, सोलर (सूर्योपासून), जल, पवण (वारा), इत्यादी स्तोत्रापासून ऊर्जा निर्मिती करत आहे पण यांनासुद्धा मर्यादा आहेत. पुढील अगदी कमीत कमी ५० वर्षाचा विचार करून व वरील कारण्यासाठी लागणारी ऊर्जा ही प्रचंड प्रमाणात निर्माण करावी लागणारी आहे सध्या भारतात अंदाजे २.००० किलो, वॅट तास दरडोई लागणारी आहे व पुढील काळात कदाचित ती ५.०००कीलो वॅट तासा च्य वरती जाईल ही गरज कशी पुरवायची ही एक मोठी समस्या आज भेडसावत आहे.
यासाठी अणुऊर्जेच्या निर्मितीवर जोर दिला जातोय ,सोलर ऊर्जा ची निर्मिती आपल्याला सतत वर्षभर करता येत नाही, जलस्तोत्रसाठी पावसावर अवलंबून राहावे लागते, पवन ऊर्जासाठी वाऱ्यावर अवलंबून राहावे लागते, त्यातल्या त्यात सौर, जल, पवन ही स्तोत्रं आपल्याला उपलब्ध आहेत व कुटल्याही प्रमाणात हानिकारक नाहीत. परदेशामध्ये या दोन स्तोत्रं प्रचंड प्रमाणात ऊर्जा निर्मितीसाठी वापरली जातात, भारतातही ह्याचा वापर वेगाने सुरू होत आहे, पवन ऊर्जेसाठी आपल्याला भरपूर वाव आहे, आपण कुठेही पवन चक्की उभा करू शकतो नापीक जमीन, डोंगराळ भाग, शेतात, समुद्रात, अथवा छोटी चक्की घरी उभा करून वीज निर्मिती करू शकतो. पण जेथे हवेचा वेग जास्त हवा. अश्याच प्रकारे सोलर पॅनल चा वापर करून आपण ऊर्जा निर्माण कर शकतो. पण गरज पाहता हे पुरेशी होईल असे दिसत नाही. तरी पण आपले सरकार अशी स्तोत्रं वापरून कोणी ऊर्जा निर्मिती करीत असेल तर त्यासाठी शासकीय सवलत, अनुदान, व कर्जां मध्ये व्याजदरात विशेष सवलत देत असते. य सर्वाँ मध्ये अणुऊर्जा स्तोत्र हे फार महत्वाचे आहे, जरूर त्यामध्ये मोठे धोके आहेत, पर्यावरणाचा विचार पण आहे, या सर्वानचा विचार करून असे विद्युत निर्माण केंद्र, छोटी छोटी का असेनात पण करावी लागणार असे वाटते. त्या साठी भारत देशात भरपूर प्रमाणात विचार होतोय व अशी विद्युत केंद्र उभी झालेली आहेत व ऊर्जा निर्मिती होत आहे. कमी खर्चातून, मानवास, पर्यावरणास,वण्य जीवास, जलचर प्राणी, पशुपक्षी यांना त्रास व हानी व यांची प्रजाती नष्ट न होता कामा नये. कारण निसर्गाचा समतोल पणा राखण्याचे काम यामुळे होत असते अशी हानी न होता अक्षय ऊर्जा निर्मिती केली पाहिजे व त्यासाठी देशाचे प्रयत्न चालू आहेत जो पर्यंत असे काही निर्माण होत नाही तो पर्यंत आपल्याला मिळणाऱ्या या स्तोत्रवर अवलंबून वीज निर्मिती करावी लागणार आहे,
या साठी आपण सर्वांनी अवशक्य तेवढ्याच विजेचा वापर केला पाहिजे नको असेल तेथ व गरज नसेल अशा ठिकाणचा वीज प्रवाह बंद ठेवला पाहिजे व नवनवीन आलेले ऊर्जेची बचत करणारी उपकरणे वापरली पाहिजे, शेवटी असं सांगावंस वाटतं सद्ध्या तर ऊर्जा बचाव हे सूत्र अपणा सर्वाँना अंगीकारले पाहिजे.
धन्यवाद!

लेखक : प्रदीप घाटगे

संपर्क नंबर 96 23 06 42 17

लेखकः इलेक्ट्रिकल इंजिनिअर असून त्यांनी पॉवर जनरेशन (एन. टी.पी.सी)भारत सरकार, कोळसा व गॅस पासून वीजनिर्मिती करणाऱ्या मोठ्या स्टेशन मध्ये काम केले आहे. तसेच पवन ऊर्जा (पवणचक्की) पासून ऊर्जा निर्माण करणारी मोठी सुझलोन कंपनी मध्ये वरिष्ठ व्यवस्थापक (क्यावलटी व सेफ्टी) क्षेत्रात (General Manager) म्हणून काम केले आहे.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *