हिंदु-मुस्लिम ऐक्याचे प्रतिक असलेले बाबूजमाल दर्गा येथील कुदळ जमाल झारी यांच्या हस्ते मारण्यात येणार आहे.

प्रतिनिधी : नियाज जमादार

कोल्हापूर : हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतिक असलेल्या तसेच मानाची ह. बाबुजमाल दर्गा कोल्हापूर येथील कुदळ गुरुवार दिनांक 20 ऑगस्ट 2020 रोजी सोशल डीस्टंसिंग,मास्क, सेनेटराईज चे वापर करून प्रशासनाच्या नियमांचे पालन करुन जमाल झारी यांच्या हस्ते कुदळ मारण्यात येणार आहे.यावेळी अमिन झारी, बाबुजमाल दर्ग्याचे मुख्य खादिम लियाकत मुजावर,शकील मुतवल्ली, आयनुद्दीन मुल्ला,अल्ताफ मुतवल्ली,जावेद सय्यद, बाबुजमाल तालीम मंडळाचे अध्यक्ष अमित चव्हाण,फिरोज मुजावर,इम्तियाज मुतवल्ली,दिलावर मुजावर, शाहरूख गडवाले उपस्थित राहणार आहेत. ज्या दिवशी बकरी ईद साजरी केली जाते.वीस दिवसांनी त्याच दिवशी खत्तलरात्र येते त्याप्रमाणे उद्या कुदळ मारण्यात येणार आहे.याची नोंद सर्व तालीम मंडळ संस्थान , पीर पंजे बसविणारे ,भाविक यांनी घ्यावे.गणेशोत्सव आणि मोहरम नियमांचे पालन करुन पार पाडावे.असे आवाहन शाहरूख गडवाले भाजपा अ. यु.मो. प्रमुख कोल्हापूर यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *