शाहू महाराज यांच्या नावाने ओळखणारा शाहूरोडवर मोठा खड्डा..

विशेष प्रतिनिधी : सतीश चव्हाण

कोल्हापूर : व्हिनस कॉर्नर ते दसरा चौक या मुख्य रोडवर पावसाच्या अतिवृष्टी मुळे जीवघेणा खड्डा पडला आहे. 

Advertisements

परिसरातील नागरिक आणि दुकानदार यांना समोर गाड्या आदळून खड्ड्यांमध्ये पडताना पाहून हळहळ व्यक्त करून लगबगीने उठवण्यास जातात.

मात्र कोरोना विषाणूचा पादुर्भाव वाढत चालला असून भीतीचे वातावरण सर्वत्र आहे अशातच सध्याच्या स्थितीत रोडवर 5,000,रूपये रोडवर पडलेले दिसले तरी कोणी कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचे तरी पडले नसेल ना मनामध्ये अनेक भीतीचे प्रश्न निर्माण होतात आणि कोरोना विषाणूच्या भीतीने कोणी उठवण्यास जात नसे.

पण माणुसकीच्या भावनेने खड्ड्यात एखादी गाडी पडून अपघात होताना बघून वाहन चालकाला उठवल्याशिवाय मन राहवत नाही.

भागातील नागरिक म्हणतात , प्रसार माध्यम मध्ये आम्ही नेहमी महानगर पालिका व प्रशासन युद्धपातळीवर कोरोना विषाणूचा संक्रमण रोखण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याच्या. सोशल डिस्टन पाळा , मास्क वापरा, सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास पाचशे रुपये दंड केले जाईल, अशी बातमी वाचत असतो.

मग महानगरपालिका अधिकाऱ्यांना एवढा मोठा खड्डा कसा दिसत नाही ? असा प्रश्न डोक्यात घोंगावत राहतो. अपघात होऊन कोणाचा जीव जायच्या अगोदर महानगर पालिका याकडे लक्ष देईल का?अशी चर्चा भागातील नागरिक करताना दिसतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *