कोल्हापूर शिवाजी शिंगे : हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतिक असलेल्या तसेच मानाची ह. बाबुजमाल दर्गा कोल्हापूर येथील कुदळ गुरुवार दिनांक २० ऑगस्ट २०२० रोजी सोशल डीस्टंसिंग,मास्क, सॅनेटाईज यांचा वापर करून प्रशासनाच्या नियमांचे पालन करुन अमिन झारी यांच्या हस्ते कुदळ मारण्यात आली.
तसेच कोरोना महामारी , महापुर तसेच विश्वशांतीसाठी प्रार्थना करण्यात आली.
यावेळी जमाल झारी, बाबुजमाल दर्ग्याचे मुख्य खादिम लियाकत मुजावर, आयनुद्दीन मुल्ला,अल्ताफ मुतवल्ली,इम्तियाज मुतवल्ली,जावेद सय्यद, शाहरूख गडवाले ,बाबुजमाल तालीम मंडळाचे अध्यक्ष अमित चव्हाण,नगरसेवक तौफिक मुल्लाणी, मुजावर, शकील मुतवल्ली, जमाल मुल्ला,दिलावर मुजावर,ओंकार कसबेकर ,इब्राहीम सय्यद,बंटी मुजावर,सरदार जमादार, उपस्थित होते.
ज्या दिवशी बकरी ईद साजरी केली जाते.वीस दिवसांनी त्याच दिवशी खत्तलरात्र येते त्याप्रमाणे कुदळ मारण्यात आली.
आज शुक्रवारी २१ ऑगस्ट रोजी बाबुजमाल दर्गा व तालीम मंडळाचा मानाचा पंजा न्याल्याहैदर बसणार आहे.
त्यानंतर कोल्हापुरातील सर्वच पिरपंज्याची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. गणेशोत्सव आणि मोहरम नियमांचे पालन करुन पार पाडावे, असे आवाहन शाहरूख गडवाले भाजपा अ. यु.मो. प्रमुख कोल्हापूर यांनी केले.