विशेष प्रतिनिधी संतोष कुरणे
सतर्क पोलीस टाइम्स या प्रसार माध्यमाचे सांगली जिल्हा संपादक यांना अपमानास्पद वागणूक दिल्या बदल जिल्हाधिकार्यांना निवेदन देण्यात आले.
पत्रकार हा लोकशाही चा चौथा स्तंभ आहे. आणि पत्रकारांना कोणत्याही ठिकाणी जाऊन पत्रकारिता करण्यासाठी संविधानाने अधिकार दिले आहेत.
केंद्र शासन व राज्य शासनाने देखील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन सारख्या मोठा निर्णय घेतला. लॉकडाउन मधून प्रसारमाध्यमांना वगळले आहे.
त्यामध्ये प्रसारमाध्यम आणि त्यांचे प्रतिनिधी पत्रकार अतिमहत्त्वाच्या व्यक्तीं म्हणून विशेष स्थान देण्यात आले आहे. त्यांचे ओळखपत्र पाहून त्यांना कोठेही अडवायचं नाही शासनाचा असे आदेश असताना देखील मिरज वैद्यकीय महाविद्यालय येथे दि 31/8/2020
रोजी सतर्क पोलिस टाईम्स प्रसार माध्यमचे
संपादक व राष्ट्रीय अन्याय निवारण महासंघाचे सांगली जिल्ह्याचे संपर्क प्रमूख तोहीद मुल्ला हे मिरज शासकीय रुग्णालय येथे संपादकाचे मामा ऍडमिट असल्याने त्यांना विचारपूस करण्यासाठी व संबंधित डॉक्टरांना भेटून माहिती घेण्यासाठी मिरज शासकीय रुग्णालयात गेले असता
संपादक तोहीद मुल्ला यांना तेथील सुरक्षा रक्षकाने भेटण्यास नकार करून त्यांना अपमानास्पद वागणूक देऊन अरेरावी भाषा करत त्यांच्या अंगावर धावून येऊन हाकलण्याचा प्रयत्न केल्याने.
पत्रकारांचा सर्व क्षेत्रांमध्ये योगदान असून पत्रकारांना असे वागणूक मिळत असेल तर सर्वसामान्यांचे गय काय!
सतर्क पोलिस टाईम्स व राष्ट्रीय अन्याय निवारण महासंघाच्या वतीने आम्ही या घटनेचा जाहीर निषेध करतो. येथून पुढे असे प्रकार पत्रकार व संपादकांच्या बाबतीत घडलेस संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडणयात येईल .
तरी आपणास विनंती आहे की संबंधित सुरक्षा रक्षक दिगंबर तानाजी भोसले यांच्यावर कठोर ते कठोर कारवाई करून निलंबनाची कारवाई केली जावी अशी मागणी आपणाकडे सतर्क पोलीस टाइम्स व संघटनेच्या वतीने करण्यात येत आहे. आठ दिवसात कारवाई न झालेस आपल्या कार्यालया समोर पत्रकार व संघटना तर्फे बोंबठोक आंदोलन छेडणयात येईल.असे इशारा देण्यात आले.
या घटनेची दखल घेऊन युवा पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य सांगली जिल्हा अध्यक्ष संतोष कुरणे. जाहीर निषेध करत पत्रकारांच्या वरती हल्ले व अवमानकारक प्रकार घडत असेल तर संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन छेडण्यासाठी बैठक बोलवण्यात आल्याचे सांगितले.