Share Now
Read Time:1 Minute, 21 Second
कोल्हापूर प्रतिनिधी सतीश चव्हाण : कोल्हापूर येथील मिरजकर तिकटी येथे पृथ्वीराज जगताप युवा मंच व नृसिंह दोस्त मंडळ यांच्यावतीने सिद्धेश्वर महाराज यांची इम्मुनिटी बूस्टर औषधाचे वाटण्यात आले.
या कार्यक्रमाचे उद्घाटन सामाजिक कार्यकर्ते दिलीप देसाई व आहार हॉटेलचे मालक प्रकाश जगताप यांच्या हस्ते करण्यात आले.
हे औषध किमान तीन हजार लोकांनी पुरेल एवढं असून लोकांनी त्याचा लाभ घ्यावा अशी विनंती युवा मंचचे अध्यक्ष पृथ्वीराज जगताप यांनी केले आहे.यावेळी नागरिकांनी मास्कचा वापर करत , सोशल डिस्टंसिंगचे पालन करत हे औषध घेतले.
यावेळी श्रीकांत माने, अमर सरनाईक, रणजीत पाटील , तेजस जिरगे, नचिकेत बागलकोठे, रणजीत जगताप, महेश नार्वेकर, ऋषिकेश सुतार, चिन्मय वेळापुरे व मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.
Share Now