गडमुडशिंगीत बकरे चोरणाऱ्या तिघांवर गुन्हा दाखल

विशेष प्रतिनिधी : सुलोचना नार्वेकर
कोल्हापूर : बकरे चोरून वाटे घालून विकण्याचा प्रयत्न करणाऱ्या उमेश श्रीपती सावंत ( रा. कोतोली ता. पन्हाळा), सनी गोंधळी, सुप्रीम संजय सातपुते ( दोघेही रा. गडमुडशिंगी, ता. करवीर) या तिघांवर गांधीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

 हा प्रकार गडमुडशिंगी येथे झाला असून ग्रामस्थ व मेंढपाळानी पोलिसांना कळवून आरोपीवर गुन्हा दाखल करण्यास भाग पडले. पोलीस आणखी काही आरोपींच्या शोधात आहेत.

मेंढपाळाच्या कळपातील बकरे चोरून ते मोटरसायकलवरून घेऊन जाऊन वाटे घालून विकण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या या तिघांना मेंढपाळांनी व इतरांनी पकडून दिले.

 याबाबतची फिर्याद मारुती आनंदा जोंग (रा. दिंडनेर्ली, ता. करवीर) या मेंढपाळाने गांधीनगर पोलीस ठाण्यात दिली असून या तिघांवर गुन्हा नोंद झाला आहे.

 

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *