राधानगरी प्रतिनिधी अतुल पाटील : बांधकाम कामगार मंडळाने कोविड हॉस्पिटल उभारावे. कोविड रोगासाठी उपचार घेणाऱ्या अथवा उपचार पूर्ण केलेल्या नोंदीत बांधकाम कामगारांना ५० हजार रुपये कामगारांच्या बँक खात्यावर जमा करावेत , अशी मागणी कामगार नेते अमित कदम यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन बांधकाम कामगार कल्याण मंडळाचे सचिव श्रीरंग यांना देण्यात आले.
इमारत व इतर बांधकाम कामगारांना कोरोना महामारीमुळे राज्यातील बांधकाम कामगारांवर आर्थिक संकट ओढवल्याचे दिसून येत आहे. यास मदतीचा भाग म्हणून बांधकाम कामगार मंडळाने २ व ३ हजार रुपये अनुदान तातडीने कामगारांच्या खात्यावर जमा करण्यास सुरुवात केली आहे. आर्थिक अडचणीमुळे कामगारांना कोविड उपचारासाठी पैसे उपलब्ध करणे अशक्य आहे. बांधकाम कामगार मंडळाने उपलब्ध कोट्यावधी रक्कमेचा वापर होणे गरजेचा आहे, तरी बांधकाम कामगार मंडळाने कोविड हॉस्पिटल उभारावे व कोविड रोगासाठी उपचार घेत असलेल्या अथवा उपचार पूर्ण केलेल्या नोंदीत बांधकाम कामगारांना ५० हजार रुपये कामगारांच्या बँक खात्यावर जमा करावी , अशी मागणी भाजप कामगार आघाडी व स्वराज्य जनरल कामगार सेनेच्या वतीने करण्यात आली आहे.