Share Now
Read Time:1 Minute, 20 Second
सांगली प्रतिनिधी संतोष कुरणे /शरद गाडे
सांगलीचे नूतन पोलीस अधीक्षक. सिंधुदुर्गचे पोलीस अधीक्षक दिक्षितकुमार गेडाम यांची नियुक्ती झाली आहे.
गुरुवारी रात्री उशिरा बदलीचे आदेश गृह विभागाच्यावतीने प्राप्त झाले. बदली झालेल्या अधिकाऱ्यांना तातडीने पदभार स्वीकारण्याचे आदेशात नमूद केले आहे.
पोलीस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम हे २०११ मध्ये आय.पी.एस झाले.
बीड येथे अतिरिक्त पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत असताना त्यांनी अवैध धंदे व अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाईचा बडगा उगारला होता.
त्यांनी स्वत: पहाटे ५ वाजता डोंगर-दऱ्यामध्ये जाऊन तेथे असणाऱ्या दारूभट्ट्या उद्ध्वस्त करून कारवाई केली आहे 2017 पासून आय.पी.एस अधिकारी दीक्षित कुमार गेडाम हे
सिंधुदुर्गचे पोलीस अधीक्षक या पदावर कार्यरत होते.
Share Now