प्रतिनिधी : जावेद देवडी
महावितरणच्या सानेगुरूजी शाखा कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी कोल्हापूर महानगर पालिकेच्या पंचगंगा स्मशानभूमीस अंत्यसंस्कारासाठी पाच हजार शेणी दान केल्या आहेत.
कोरोनामुळे अंत्यसंस्काराचा वाढता ताण लक्षात घेता महापालिका महापौर व आयुक्तांनी स्मशानभूमीस शेणीची आवश्यकता भासत असल्याने दानशुर व्यक्ति, सेवाभावी संस्थाना शेणी दान करण्याचे आवाहन केले आहे. या आवाहानाला सकारात्मक प्रतिसाद देत महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी सामाजिक बांधिलकी जपत स्वयंस्फूर्तपणे शेणी दान केल्या आहेत.
कोल्हापूर पश्चिम उपविभागातील शाखा कार्यालय सानेगुरुजीचे सहाय्यक अभियंता प्रवीण शेटगे व त्यांचे सहकारी शीतल आंबेकर, संजय थोरबोले, सर्जेराव विभूते, अशोक कुंभार, राहुल साळोखे, महेश चव्हाण, प्रतीराज पाटील, शेखर चव्हाण, चैतन्य अंकलीकर, निकेश साखरे, सीमा गुरव, स्वाती नाईक, कृष्णात कुंभार, कृष्णात यादव, सतीश कांबळे, ओमकार चौधरी, तेजराज मोरे यांनी हा उपक्रम राबविला.