प्रतिनिधी : शरद गाडे
कोरोना पॉझिटिव्ह मृत्यू देह दहनविधी संध्याकाळी सहानंतर केला जात नाही त्याबाबत माननीय आयुक्त नितीन कापडणीस यांना मा.मदन भाऊ पाटील युवा मंच यांच्याकडून निवेदन देण्यात आले.
मिरज पंढरपुर रोडवरील कोरोना पॉझिटिव्ह मृतदेहाचा अंत्यविधी करण्याची मनपाकडून जी सोय केलेली आहे त्या ठिकाणी सकाळी आठ ते संध्याकाळी सहा या वेळेतच दहन विधी केला जातो तसे न करता कोरोना रुग्ण सोडून 24 तासात केव्हाही विधी केला जातो त्याच प्रमाणे कोरोना ग्रस्त मृतदेहावर 24 तास विधी करण्याचे नियोजन करावे आता सध्या परिस्थितीत वीस-वीस तास कोरोना ग्रस्त मृतदेहावर विधी होत नाही या काळात मृतदेहाच्या नातेवाईकांचे खूप मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत त्याचबरोबर मृतदेहाची ही मोठ्या प्रमाणावर हेळसांड होते आहे. या आणीबाणीच्या काळात मनपा प्रशासनावर मोठ्या प्रमाणात ताण आहे जिल्ह्यातील सर्व कोरोनाग्रस्त मृतदेहावर अंत्यविधी करण्याचे काम मनपा प्रशासनावर येऊन पडले आहे मनपा प्रशासनाचा कर्मचारीवर्ग कमी पडत असून मनपा त्यातूनही चांगले उत्कृष्ट काम करत आहे परंतु पंढरपूर रोड वरील अंत्यविधी करण्याच्या ठिकाणी सायंकाळी सहानंतर अंत्यविधीसाठी मृतदेह स्वीकारले जात नाही यात बदल करून 24 तास अंत्यविधी करण्यासाठी योग्य ते नियोजन करावे व होणाऱ्या कोरोना ग्रस्त मृतदेहाची हेळसांड व नातेवाईकांचे होणारे हाल थांबवावेत वीस-वीस तास मृतदेहावर अंत्यविधी होत नसल्यामुळे लोकांच्या मधून उद्रेक होण्याची दाट शक्यता आहे तरी याचा सहानुभूतीपूर्वक व मानवतावादी दृष्टीकोनातून योग्य तो निर्णय घ्यावा अशी विनंती मा. मदन भाऊ पाटील युवा मंच यांच्याकडून आयुक्त नितीन कापडणीस यांना केली आहे.
————————–जाहिरात ————————–