कोल्हापूर,दि. २ (प्रतिनिधी) कोरोना काळापासून अविरत कार्यरत असणारे कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांच्या कोरोना काळातील आरोग्य सेवेतील कार्याची दखल घेऊन त्यांना कोल्हापूरकर नागरिक तसेच बहुजन,परिवर्तनवादी समाज,पक्ष,संघटनांच्या वतीने कोरोना महायोद्धा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
या प्रसंगीकोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.अमन मित्तल उपस्थित होते.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादीचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष बाळासाहेब बेलेकर यांच्या हस्ते कोरोना महायोद्धा स्मृतिचिन्ह, शाॅल,श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ अमन मित्तल यांचे कोल्हापूर बहुजन पत्रकार संघाचे अध्यक्ष रविराज कोल्हटकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे आयोजन परिवर्तन फाऊंडेशनचे अध्यक्ष अमोल कुरणे यांनी केले होते.
यावेळी रविसागर हाळवणकर,मुबारक आत्तार, रि पा इं एकतावादीचे अनिल धनवडे,पृथ्वीराज कटके, अभिजीत शिरोशी आदी उपस्थित होते.