खासदारकीचा वापर मिरवण्यासाठी नव्हे तर जिल्हयाची शान वाढवण्यासाठी केला, भाजप प्रदेश प्रवक्ते धनंजय महाडिक यांचं प्रतिपादन

0 0
Getting your Trinity Audio player ready...

Share Now

Read Time:3 Minute, 28 Second

मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क

करवीर तालुक्यातील दोनवडे येथे ग्रामपंचायत कार्यालयाच्या नवीन कार्यालय इमारतीचे झाले उद्घाटन

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील जनतेनं मला खासदार केलं आणि या खासदारकीचा वापर मिरवण्यासाठी नव्हे तर जिल्हयाचा विकास करण्यासाठी आपण केला. केवळ स्वहित बघण्याऐवजी कोल्हापूरची शान वाढवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केला. कोल्हापूरकरांनी महाडिक घराण्याला आमदार, खासदार, जिल्हापरिषद अध्यक्ष अशी पदं दिली. त्यामुळं सात जन्मात कोल्हापूरच्या जनतेचं आपल्यावरील ऋण फिटणार नाही असं मत भाजप प्रदेश प्रवक्ते धनंजय महाडिक यांनी केलं. करवीर तालुक्यातील दोनवडे इथल्या ग्रामपंचायत कार्यालयाच्या नवीन इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

करवीर तालुक्यातील दोनवडे इथं ग्रामपंचायत कार्यालयाची नवीन इमारती बांधण्यात आलीय. त्याचा उद्घाटन सोहळा भाजप प्रदेश प्रवक्ते धनंजय महाडिक यांच्या हस्ते आणि सरपंच सारिका जाधव यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी महाडिक म्हणाले, आपल्या खासदारकीच्या पाच वर्षाच्या कालावधीत, कोल्हापूर लोकसभा मतदार संघात विमानतळ, रेल्वे स्टेशनचे आधुनिकीकरण यासह महत्वाच्या पायाभूत सुविधांसाठी कोट्यवधीचा निधी खेचून आणला. सलग तीनवेळा संसदरत्न, लोकसभेत सर्वाधिक प्रश्न विचारणारा खासदार म्हणून माझा सन्मान झाला. हा सन्मान माझा नसून कोल्हापूरच्या जनतेचा आहे. यशापयश गौण आहे. माझ्याकडं पद नसलं तरी विकास कामांसाठी निधी आणण्याची आपल्यात ताकद असल्याचं त्यांनी नमुद केलं. केंद्रातील भाजप सरकारनं कोरोना काळात देशातील ९० कोटी जनतेला मोफत धान्य देऊन जगण्याची उमेद दिली. जगातील कोणताही देश असा उपक्रम हाती घेवू शकला नाही. मोफत लसीकरणाची मोहीम राबवून कोरोना विरोधातील लढाई मध्ये ऐतिहासिक कामगिरी केली आहे. महाडीक यांनी ७ लाख रूपयांचा निधी दिला म्हणूनच ग्रामपंचायतीचं नवीन कार्यालय उभारता आलं, असं संभाजी पाटील यांनी सांगितलं. कार्यक्रमाला उपसरपंच चिंतामन कांबळे, दिलिप जाधव, दिपाली कदम, वसंत पाटील, चिंतामणी गुरव, ग्रामसेवक संभाजी पाटील यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, विविध संस्थाचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *