Share Now
कोल्हापूर/प्रतिनिधी-
कणेरी मठ : महिलांनी हस्तकेलेचे प्रशिक्षण घेऊन आत्मनिर्भर बनण्याबरोबरच उद्यमी बनावे, असे आवाहन राज्य जीएसटीच्या उपनिदेशक श्रीमती शर्मिला विनय मिस्किन यांनी आज केले.
कणेरी मठ येथे महिलांच्या समर्थ योजनेअंतर्गत प्रशिक्षण केंद्राचे उदघाटन त्यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्या बोलत होत्या. सहायक निदेशक हस्तशिल्प केंद्राच्या वतीने महिलांसाठी दोन महिने चालणाऱ्या या प्रशिक्षण केंद्रांच्या उदघाटनप्रसंगी इंडोकाऊंट कंपनीचे राजेश मोहिते, हस्तकला विभागाचे सहायक निदेशक चंद्रशेखर सिंग, प्रशिक्षण अधिकारी रितेश कुमार यांच्यासह महिला उपस्थित होत्या.
दरम्यान, या महिलांनी बनविलेल्या हस्तकलेचे प्रदर्शन कणेरी मठ येथे आयोजित केले जाणार आहे, तर या सर्व महिलांना इंडो काऊंट रोजगाराची संधी देण्याचे आश्वासन राजेश मोहिते यांनी दिले.
Share Now