Getting your Trinity Audio player ready...
|
कोल्हापूर/प्रतिनिधी:- जिल्हाधिकारी कार्यालय येथे आमदार मा. श्री.राजेश पाटील व जिल्हाधिकारी मा. श्री. राहुल रेखावर यांच्या हस्ते जनजागृतीपर बोर्ड (स्टँडी) व एल.ई.डी. सरकते संदेश यांचे उदघाटन करण्यात आले. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, अति. जिल्हा शल्य चिकित्सक, डॉ. पी.एन.देवकर जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. यु.जी. कुंभार, वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुनंदा गायकवाड, उपस्थित होते. मा. जिल्हाधिकारीसो यांच्या मार्गदर्शन व नियोजनानुसार बोर्ड लावण्यात आले.या जनजागृतीपर बोर्ड व सरकते संदेश लावण्याचा उद्देश हा सर्वसामान्य लोकांमध्ये क्षयरोगविषीयी जनजागृती करणे व क्षयरोगाची लक्षणे, उपचार, टी.बी. विषयक शासकीय योजना,व क्षयरोग नोटिफिकेशन कायदा या विषयी माहिती कळणे हा आहे.
जिल्हा परिषद येथे मा. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. संजयसिंह चव्हाण व उपाध्यक्ष जिल्हा परिषद कोल्हापूर श्री. जयवंत शिंपी यांच्या हस्ते जनजागृतीपर बोर्ड (स्टँडी) व एल. ई. डी. सरकते संदेश यांचे उदघाटन करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य महेश चव्हाण तसेच शशिकांत खोत,विजय पाटील,अमर पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे,जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. यु.जी.कुंभार उपस्थित होते. मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शन व नियोजनानुसार बोर्ड लावण्यात आले. या जनजागृतीपर बोर्ड व सरकते संदेश लावण्याचा उद्देश हा सर्वसामान्य लोकांमध्ये क्षयरोगविषीयी जनजागृती करणे व क्षयरोगाची लक्षणे, उपचार, टी.बी. विषयक शासकीय योजना,व क्षयरोग नोटिफिकेशन कायदा या विषयी माहिती कळणे हा आहे.
क्षयरोग जनजागृतीपर बोर्ड वर निःशुल्क रोगनिदान व औषधोपचार माहिती, निक्षय पोषण योजनेतंर्गत क्षयरुग्णाचा उपचार पूर्ण होईपर्यंत रु. ५०० पोषण आहारासाठी आर्थिक मदत (शासकीय व खाजगी दवाखान्यातील) रुग्णाच्या खात्यात जमा करणे, क्षयरुग्णाची नोंद कार्यक्रमातंर्गत करणाच्या वैदयकीय व्यावसायिकास रु. ५०० मानधन व क्षयरुग्णाचा उपचार पूर्ण करुन घेतल्यास पुन्हा रु. ५०० मानधन, क्षयरूग्णाचा उपचार यशस्वीपणे पूर्ण करणाच्या उपचार सहाय्यकास रुग्णामागे रु. १००० मानधन इ. सुविधा विषयक माहिती तसेच रुग्णांची नोंद न केल्यास संबंधित खाजगी रुग्णालयांना व वैदयकीय व्यावसायिकांना भारतीय दंड संहिता (१८६० च्या ४५) च्या कलम माहिती २६९ आणि २७० च्या अतंर्गत शिक्षा होऊ शकते. याबाबत माहिती दिली आहे. न