Share Now
मार्था भोसले कोल्हापूर/प्रतिनिधी: मुरगूड येथे शुभम जयवंत गायकवाड(वय २० रा. संत कबीर गल्ली, मुरगूड,कागल) याच्या शेतातील शेडवर स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने छापा टाकून गावठी बनावटी बंदूक जप्त केली. याप्रकरणी तिघांना अटक करून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार
मुरगूड येथील शेतात शुभम गायकवाड याने विनापरवाना गावठी बनावटी बंदूक जवळ बाळगली असल्याची महिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी शुभम गायकवाड याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून गावठी बनावटीची बोअरची सिंगल बॅरेल असलेली बंदूक जप्त केली. या प्रकरणी आणखी दोघांना ही अटक करण्यात आली. किरण सावंत(२४ कागल) व अरविंद देसाई(४३ वेंगरुळ, ता.भुदरगड) यांनी शुभम ला ती बंदूक पुरवल्याची माहिती चौकशीतून पुढे आली. स्थानिक गुन्हे अन्वेषण चे प्रमोद जाधव यांच्या पथकाने ही कारवाई केली.
(किरण सावंत)
(अरविंद देसाई)
Share Now