सायलेज बेलर मशिन युनिटसाठी १७ मार्च पर्यंत अर्ज करावेत : डॉ. वाय.ए.पठाण

0 0
Getting your Trinity Audio player ready...

Share Now

Read Time:3 Minute, 33 Second

कोल्हापूर/प्रतिनिधी : राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत जिल्ह्याकरिता मुरघास निर्मितीसाठी ‘सायलेज बेलर मशिन युनिट’ स्थापन करण्याकरिता जिल्ह्यातील सहकारी दुध उत्पादक, शेतकरी उत्पादक संस्था, स्वयंसहाय्यता बचत गट व गोशाळा, पांजरपोळ, गोरक्षण संस्थांना सायलेज बेलर मशिन युनिटचा लाभ देण्यात येणार आहे. योजनेसाठीचा अर्ज संबंधित तालुक्यातील पंचायत समिती येथे पशुधन विकास अधिकारी (विस्तार) कार्यालयात उपलब्ध असून दि. १७ मार्च अखेर अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. वाय.ए.पठाण यांनी केले आहे.

मुरघास निर्मितीकरिता सायलेज बेलर मशिन युनिटमध्ये खालील बाबींचा समावेश राहील 

सायलेज बेलर, हेवी ड्युटी कडबा कुट्टी यंत्र (किमान २ मे.टन प्रती तास), ट्रॅक्टर व ट्रॉली, वजनकाटा, हार्वेस्टर, मशिन शेड, वरीलपैकी सायलेज बेलर व हेवी ड्युटी कडबा कुट्टी यंत्र या मशिनरीची खरेदी करणे आवश्यक आहे. या योजनेमधून खरेदी केलेल्या मशिनरीची शासनाच्या संमतीशिवाय परस्पर विक्री करता येणार नाही. यासाठी संस्थेस ५०० रु.च्या मुद्रांकावर रीतसर करारनामा करून द्यावा लागेल. विभागाचे अधिकारी भेटीस आल्यानंतर संस्थेने संबंधित अधिकाऱ्यांना मशिनरी दाखविणे बंधनकारक असेल. योजनेचा उद्देश मुरघास निर्मितीस प्रोत्साहन देणे हा असल्याने संस्था मशिनरीच्या सहाय्याने मुरघास तयार करून विक्री करील. मुरघास निर्मितीसाठी कच्या मालाचे (हिरवी वैरण) उत्पादन अथवा खरेदी, मजुरी खर्च, इंधन खर्च व इतर अनुषांघिक खर्च मशिनरी दुरुस्ती खर्च संस्थेला स्वतःला करावा लागेल. संस्था मुरघास विक्रीतून माफक नफा मिळवू शकेल.

योजनेसाठी प्रती युनिट २० लाख रुपये खर्चापैकी ५० टक्के म्हणजेच १० लाख रुपये केंद्र शासनाचे अर्थसहाय्य असून उर्वरित ५० टक्के १० लाख रुपये संस्थेने स्वतः खर्च करावयाचे आहे. संस्थेच्या स्वहीस्सा निधीकरिता संस्था स्वनिधीतून खर्च करू शकेल अथवा आवश्यकतेनुसार बँकेकडून कर्ज घेऊ शकेल. बँकेकडून कर्ज घेतल्यास कर्जाची परतफेड करण्याची संपूर्ण जबाबदारी संस्थेची असेल. या योजनेसाठी सर्वसाधारण प्रवर्गातील संस्थानीच अर्ज सादर करावेत, असेही डॉ. पठाण यांनी पत्रकाव्दारे कळविले आहे.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *